कर्मचार्यांनी सार्वजनिक स्वच्छता, तसेच निर्जंतुकीकरण, रुग्णसेवा, यासोबतच स्मशानभूमीत देखील काम केले आहे. आणि खरच हे काम कौतुकास्पद होते.Good news! Seventh Pay Commission to be implemented for Thane Municipal Corporation employees.
विशेष प्रतिनिधी
ठाणे : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केली आहे. कोरोनाचा काळात अत्यंत कठीण परिस्थिती निर्माण झाली होती . कोरोनाने लोकांचा जीव देखील जात होता. मात्र अशावेळी देखील स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य पार पाडले.
यामध्ये कर्मचार्यांनी सार्वजनिक स्वच्छता, तसेच निर्जंतुकीकरण, रुग्णसेवा, यासोबतच स्मशानभूमीत देखील काम केले आहे. आणि खरच हे काम कौतुकास्पद होते.
त्यामुळे त्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांना मोबदला मिळावा यासाठी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा हा निर्णय घेण्यात आल्याचे श्री. शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.
सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर कर्मचाऱ्यांचे पगार कमी होतील अशी भीती कर्मचारी संघटनाच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली. यावर सहावा वेतन आयोग लागू करतानाही अशीच भीती होती. मात्र प्रशासनाने तसे काही होऊ दिले नाही असं शिंदे यांनी स्पष्ट केलं.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App