वॉटर टॅक्सी सेवा : मुंबईतील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, जानेवारी २०२२ पासून सुरू होतेय वॉटर टॅक्सी सेवा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईमधील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईमध्ये लवकरच वॉटर टॅक्सी बोट चालू होणार आहेत. जानेवारी 2022 पासून या बोट चालू होण्याची शक्यता आहे. साउथ मुंबई आणि नवी मुंबई यांना कनेक्ट करणारा हा प्रवास आता प्रवाशांसाठी अतिशय सुखकारक होणार आहे.

Good news for Mumbai people : Water taxi service starting from January 2022

बेलापूर आणि नेहरू येथे ट्रेन चेंज करुन आधी साऊथ मुंबईतून, नवी मुंबईला जावे लागायचे. पण आता हा त्रास कमी होऊन, जवळपास 30 किलोमीटर अंतर कमी प्रवास होईल. त्यामुळे बराच वेळ देखील वाचणार आहे.

पण या प्रवासाचा खर्च मात्र मोठा आहे. प्रत्येक पॅसेंजरला डोमॅस्टिक क्रुझ टर्मिनसपासून नवी मुंबईला जाण्यासाठी 1200 ते 1500 रुपये द्यावे लागणार आहेत. तर डोमॅस्टिक क्रुझ टर्मिनलपासून जेएनपीटीला जाण्यासाठी 750 रुपये प्रत्येकी खर्च आहे.


ही आहेत भारतातील बारा स्थापत्यशास्त्राची उत्तम उदाहरणे.. तुम्ही पाहिलीत?


सध्या नवी मुंबईवरून साऊथ मुंबईला येण्यासाठी रस्ता आणि ट्रेन हे दोनच मार्ग उपलब्ध आहेत. पण रस्त्याने अतिशय ट्राफिक असते आणि ट्रेनची कनेक्टिव्हिटी डायरेक्ट नाहीये. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड लांबचा प्रवास करावा लागतो.

आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल ते एलिफंटा, डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल (डीसीटी) ते रेवस, धरमतर, करंजाडे, डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल ते बेलापूर, नेरूळ, ऐरोली, वाशी, खांदेरी बेटे आणि जवाहरलाल हे रूट निश्चित केले आहेत.

Good news for Mumbai people : Water taxi service starting from January 2022

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात