प्रतिनिधी
मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा दिवाळी बोनस द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र वर्कर्स कॉंग्रेसने करण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना बोनस द्यावा, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता यांच्यात वाढ करून तो ३४ टक्क्यांपर्यंत करावा आणि दिवाळीपूर्वी थकबाकी देण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनामार्फत करण्यात आली आहे. Give ST employees same Diwali bonus as BEST
बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसची घोषणा झालेली आहे. परंतु राज्याची मुख्य सार्वजनिक वाहतूक असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी अद्याप दिवाळी बोनस जाहीर झालेला नाही. त्यामुळे सरकारने तात्काळ बोनस जाहीर करावा अशी मागणी संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
एसटी वर्कर्सच्या मागण्या
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App