आमने-सामने: खानदेशी बोलीभाषेत खडसे म्हणाले ‘गिरीश मेला का?’; गिरीश महाजन म्हणतात, खडसेंचे वय झालयं!

विशेष प्रतिनिधी

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे  यांची दूरध्वनीवरील संभाषणाची एक ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या ऑडिओ कल्पीमध्ये खडसे यांनी भाजपचे जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांच्याबाबत अनेक आक्षेपार्ह विधाने केली आहेत. या क्लीपवर आता गिरीश महाजन यांच्याकडून सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. खडसे यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यामुळे ते अशाप्रकारे विधान करत आहेत, असा टोला महाजन यांनी लगावला Girish Mahajan reaction on Eknath Khadse controversial Statement

गिरीश महाजन –
“मी खडसे यांना दोष देणार नाही. वाढतं वय, एवढे आजार आणि त्यामध्ये जो माणूस मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा करत होता त्याला बिचाऱ्याला आमदारकीपण मिळत नाहीय. त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्यासारखं आहे. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल कोणताही रोष नाही. त्यांनी बोलत राहावं. लोकांना आणि सगळ्यांना कोण काय आणि कोण काय नाही ते माहिती आहे. पण खूप वेगळ्या मनस्थितीत ते सध्या आहेत”, असं म्हणत महाजन यांनी खिल्ली उडवली .नेमकं प्रकरण काय?

एकनाथ खडसे यांच्या दूरध्वनीवरील संभाषणाची एक ऑडिओ क्लीप सध्या व्हायरल झाली आहे. या क्लीपमध्ये जामनेरमधील एक ग्रामस्थ पाणी नसल्याची तक्रार एकनाथ खडसे यांना करताना ऐकू येत आहे. त्यावर एकनाथ खडसे यांनी मग मग तुमचा आमदार गिरीश मेला का?, असे वक्तव्य केले.

एकनाथ खडसे –

जामनेरच्या वाकोदजवळ असलेल्या वडगाव बुद्रूक गावातील एका गावकऱ्याने एकनाथ खडसे यांना फोन केला होता. त्याने आपल्या गावात पाणी नसल्याची समस्या मांडली. त्यावर एकनाथ खडसे यांनी तुमचा आमदार गिरीश इकडे-तिकडे बायकांच्यामागे फिरतोय का , असे म्हटले.

त्यावर गावकऱ्याने गिरीश महाजन आपला फोन उचलत नसल्याचे सांगितले. तेव्हा एकनाथ खडसे यांनी, तो (गिरीश महाजन) फक्त पोरींचेच फोन उचलतो, असे म्हटले. तसेच आपल्या मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवायचे सोडून गिरीश महाजन पश्चिम बंगालमध्ये काय फिरत बसलेत, अशी टिप्पणीही एकनाथ खडसे यांनी केली.

ही क्लीप व्हायरल झाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी सांगीतले की तो आवाज माझाच आहे. खानदेशी भाषेत आपण अमका तमका मेला का? ‘असे सहज म्हणून जातो. ही बोलीभाषा आहे. त्यामुळे यामध्ये काही विशेष नाही, असे खडसे यांनी म्हटले आहे.

Girish Mahajan reaction on Eknath Khadse controversial Statement

महत्त्वाच्या बातम्या