जड -अवजड वाहने चोरी करणारी टोळी गजाआड


विशेष प्रतिनिधी

पुणे : मालवाहतूक करणाऱ्या वाहनांचे जीपीएस सिस्टम काढून चोरी करणारी टोळी हिंजवडी पोलिसांनी पकडली आहे. या कारवाईत पोलिसांनी या टोळीचा म्होरक्या गणेश अर्जुन पुरीसह प्रकाश नारायण गिरी, कुशल अभिमन्यू जाधव, जितेंद्र कृष्ण कुमार यादव, मुजूब मोहम्मद शेख, जमशेद उर्फ फिरोज युनूस खान यांना अटक केली आहे. gang arrested heavy vehicles is on the run

पोलिसांनी आतापर्यंत ८० लाख रुपये किंमतीच्या ७ चारचाकी अवजड वाहन आणि १ दुचाकी जप्त केली आहे. ही टोळी गाडी चोरी करण्यासाठी एक कोब्रा मॅगमन मिरची स्प्रे, एक स्क्रू ड्रायवर, एक वायर कट्टर, एक लोखंडी हतोडा, एक एक्सा कटर,१० ब्लेड आणि  चार लहान आकाराच्या चाव्या, एक रिंग पाना, दोन साधे पाने वापरत असल्याचे उघड झाले.

  • मालवाहतूक वाहने चोरी करणारी टोळी गजाआड
  • हिंजवडी पोलिसांची कारवाई
  • ८० लाखांची ७ वाहने, एक दुचाकी जप्त
  • वाहने चोरण्यास वापरलेले साहित्य जप्त
  • सहा जणांना पोलिसांनी पकडले

gang arrested heavy vehicles is on the run

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण