अनिल देशमुखांचे लाचखोरी प्रकरण आता दिल्लीत; अटक केलेल्या वकीलाला आणि सीबीआय सब इन्स्पेक्टरला दिल्लीत आणून चौकशी – तपास


वृत्तसंस्था

नवी दिल्ली – १०० कोटींच्या खंडणीखोरी प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेले ठाकरे – पवार सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुखांचे आणखी चाळे उघडकीस आले आहेत. former Maharashtra Home Minister Anil Deshmukh’s lawyer has been arrested. He has been brought to Delhi on transit remand

आपल्याला क्लीन चिट मिळावी तसेच ती बातमी बाहेर फुटावी यासाठी त्यांनी आपल्या जवळच्या माणसाकरवी सीबीआयच्या अधिकाऱ्याला लाच देऊन फितविले. आता त्या लाचखोर अधिकाऱ्यालाच अटक करण्यात आली आहे. त्याच बरोबर वकील आनंद डागा यांनाही अटक करण्यात आली आहे. दोघांनाही दिल्लीत आणण्यात आले असून त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे.

सीबीआयचे उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी अभिषेक तिवारी यांना अनिल देशमुख यांच्या जवळच्या लोकांकडून लाच घेतल्यानंतर अटक करण्यात आली. इंडिया टुडेने दिलेल्या बातमीनुसार अभिषेक तिवारी हा अनिल देशमुखांच्या वकिलाच्या संपर्कात होता. अनिल देशमुख यांच्या मुंबईतील निवासस्थानावरून बुधवारी वकिलांनाही ताब्यात घेण्यात आले. सध्या त्याची चौकशी सीबीआयकडून चौकशी केली जात आहे. अभिषेक तिवारी आणि आनंद डागा या दोघांना कोर्टात हजर केले जाणार असून त्यांची पुढची चौकशी आणि तपास महाराष्ट्रा बाहेर दिल्लीत होणार आहे.

याचा अर्थ अनिल देशमुखांच्या १०० कोटींच्या खंडणीखोरी प्रकरणाबरोबरच हे लाचखोरी प्रकरणही त्यांना गाळात रूतविणारे ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

former Maharashtra Home Minister Anil Deshmukh’s lawyer has been arrested. He has been brought to Delhi on transit remand

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात