सलग १३ तास चौकशीनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक, उत्तरे देत नसल्याचे ईडीचे म्हणणे


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची १३ तास चौकशी केल्यानंतर ईडीने मध्यरात्री एकच्या सुमारास त्यांना अटक केली. कलम १९ अंतर्गत ही अटक झाल्याचे सांगितले जात आहे. अनिल देशमुख यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.Former Home Minister Anil Deshmukh arrested by ED after 13 hours of interrogation, ED says not giving answers

दरमहा १०० कोटीच्या वसुलीच्या आरोप प्रकरणी अटक करण्यात आलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची दिवाळी ईडीच्या कोठडीत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून अज्ञातवासात असलेल्देशमुख सोमवारी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात अखेर स्वत:हून हजर झाले.



देशमुख यांच्या चौकशीसाठी ईडीचे सहसंचालक सत्यव्रत कुमार हे दिल्ली येथून खास विमानाने रात्री उशिरा मुंबईत दाखल झाले त्यानंतर या प्रकरणातील घडामोडींना वेग आला आहे. आपण निर्दोष असल्याचा दावा देशमुख यांनी केला आहे.

दरमहा १०० कोटींच्या कथित हप्ता गोळा करण्याच्या प्रकरणी दाखल मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात त्यांची दुपारी बारा वाजेपासून सुरू झालेली चौकशी रात्री एकपर्यंत सुरू होती. ईडीच्या मुंबई विभागाचा अतिरिक्त कार्यभार सत्यव्रत कुमार यांच्याकडे आहे.

आपण पळून गेलेलो नव्हतो, न्यायालयाच्या आदेशानुसार ईडी चौकशीला सहकार्य करू असे अनिल देशमुख यांनी ईडीसमोर हजर होण्यापूर्वी व्हिडिओद्वारे जाहीर केले. सीबीआय व ईडीकडून देशमुख यांची चौकशी केली जात आहे. ईडीने त्यांना पाच वेळा समन्स बजावले होते.

मात्र, देशमुख वकिलामार्फत समन्स नोटिसीला उत्तर देत होते. त्यामुळे सीबीआय, ईडीकडून त्यांच्याविरुद्ध लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती. देशमुख वकील इंद्रपाल सिंह यांच्यासह सोमवारी सकाळी ११.५० वाजता ईडीच्या कार्यालयात हजर झाले. त्यांचे खासगी सचिव संजीव पलांडे, स्वीय सहायक कुंदन शिंदे यांना ईडीने अटक केली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

मी व माझ्या कुटुंबाने तपास यंत्रणांना सहकार्यच केले आहे. पण माझ्यावर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह परदेशात पळाल्याच्या बातम्या आहेत. सचिन वाझे हत्येच्या व इतर आरोपांत तुरुंगात आहे,असा व्हिडीओ देशमुख टाकला होता. व्हिडिओमध्ये त्यांनी परमबीर परदेशात पळून गेल्याचा दावा करत पत्रात म्हटले आहे की, माझे संपूर्ण आयुष्य लोकांसाठी समर्पित केले आहे. कायद्याच्या चौकटीत राहून मी आयुष्य जगलो आहे.

त्यामुळेच माझ्या खासगी आणि सार्वजनिक आयुष्यात कोणतेही आरोप झालेले नाहीत. माझे आयुष्य खुल्या पुस्तकासारखे आहे. ज्यांची नैतिकता वा विश्वासार्हता नाही, अशांनी माझ्यावर आरोप केले. ज्या व्यक्तीने हे आरोप केले, तीच व्यक्ती कर्तव्यावर असताना खंडणी वसूल करायची व हत्येच्या गुन्ह्यातही असल्याचे दिसून येते. माझ्यायवर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आता वॉन्टेड आहेत.

Former Home Minister Anil Deshmukh arrested by ED after 13 hours of interrogation, ED says not giving answers

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात