
building collapsed in Mumbai Vikhroli area : मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत हाहाकार उडवला आहे. विक्रोळी परिसरातील पंचशीलनगरमध्ये पाच ते सहा घरांवर दरड कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. आणखीही काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी मुंबई महापालिका आणि NDRFच्या पथकाकडून मदत व बचावकार्य सुरू आहे. Five people Killed in residential building collapsed in Mumbai Vikhroli area BMC NDRF Rescue operation underway
वृत्तसंस्था
मुंबई : मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत हाहाकार उडवला आहे. विक्रोळी परिसरातील पंचशीलनगरमध्ये पाच ते सहा घरांवर दरड कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. आणखीही काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी मुंबई महापालिका आणि NDRFच्या पथकाकडून मदत व बचावकार्य सुरू आहे.
दुसरीकडे, चेंबुरमधील वाशी नाका परिसरातही घरांवर संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला असून तेथेही आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दोन्ही ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन वेगाने सुरू आहे. दोन्ही ठिकाणचा मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
#UPDATE | Five bodies have been recovered and 5-6 more people are feared trapped in the debris of the building that collapsed in Mumbai's Vikhroli, says Prashant Kadam, DCP (Zone 7) pic.twitter.com/RoXopyL1WR
— ANI (@ANI) July 18, 2021
विक्रोळीतील लाल बहादूर शास्त्री मार्गावर असलेल्या सूर्यानगर परिसरात ही दुर्घटना घडली आहे. शनिवारी मध्यरात्री पावणे तीन वाजेच्या सुमारास पाच ते सहा घरांवर दरड कोसळली. ढिगाऱ्याखाली अडकून आतापर्यंत 5 जणांनी प्राण गमावले असून एनडीआरएफच्या पथकाच्या मते आणखी पाच ते सहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
Five people Killed in residential building collapsed in Mumbai Vikhroli area BMC NDRF Rescue operation underway
महत्त्वाच्या बातम्या
- Mumbai Landslide : मुंबईत पावसाचा कहर, चेंबूरमध्ये घरांवर भिंत कोसळून 14 जण ठार, मृतांची संख्या वाढण्याची भीती
- शिवसेनेची सोनिया सेना झाली, मुंबईतील देवनार उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून भाजपाचा निशाणा
- भविष्यात देशातील १०० टक्के वाहने इथेनॉलवर चालणार, पियुष गोयल यांनी सांगितली केंद्र सरकारची योजना
- कापड उद्योगात भारताचा चीनला धक्का, कोरोना काळात अमेरिकेतील निर्यात वाढली
- टी सिरीजचे भूषण कुमार यांच्यावर बलात्काराचा आरोप खंडणीसाठी, मॉडेलसह स्थानिक नेत्याच्या विरोधात गुन्हा दाखल