विशेष प्रतिनिधी
पुणे : दोन वर्षांपूर्वी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या सहकार्याने दिव्यांग आधार केंद्र सुरु केले त्याच्या उदघाट्नास मी उपस्थित होतो. आज केंद्राच्या द्विवर्षपूर्ती निमित्ताने पुन्हा येथे येण्याचा योग आला याचा आनंद आहेच पण त्याहीपेक्षा एखादा प्रकल्प किंवा उपक्रम हातात घेतल्यावर तो यशस्वीपणे चालविणे हे महत्वाचे आहे आणि ह्याचा आनंद जास्त होतो आहे, असे गौरवोदगार महापौर मुरलीधर मोहोळ यांनी काढले. Fifteen thousand citizens took advantage of Aadhar Suvidha Kendra; Biennial completion of Divyang Aadhar and Suvidha Kendra
नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या पुढाकाराने सुरु केलेल्या दिव्यांग आधार व सुविधा केंद्राच्या द्विवर्षपूर्ती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आता लोकप्रतिनिधी आणि राजकीय कार्यकर्त्यांनी ड्रेनेज, रस्ता, कचरा, पदपथ ह्याच्या पलीकडे जाऊन काम करावे असेही महापौर म्हणाले.
दोन वर्षांपूर्वी येथे दिव्यांग आधार केंद्राचे उदघाट्न भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले, त्यानंतर येथे आधार हा शब्द वाचून अनेक नागरिकांनी आधार कार्डशी संबंधित कामे करून मिळतील का अशी विचारणा केली, त्यावरून मला येथे आधार सुविधा केंद्र सुरु करण्याची कल्पना सुचली असे मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.
शहर सरचिटणीस नगरसेवक दीपक पोटे,शहर प्रवक्ता संदीप खर्डेकर,नगरसेवक दिलीप वेडे पाटील,नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे,वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे स्वीकृत सदस्य बापूसाहेब मेंगडे व ऍड.मिताली सावळेकर,शहर चिटणीस प्रशांत हरसुले,प्रभाग अध्यक्ष राजेंद्र येडे, प्रभाग सरचिटणीस निलेश गरुडकर, ऍड. प्राची बगाटे,उद्योग आघाडीचे प्रदेश सह संयोजक विश्वजित देशपांडे,शिरीष भुजबळ, उद्योग आघाडीचे सरचिटणीस रामदास गावडे,नारायण वायदंडे, प्रतीक खर्डेकर,हेमंत बोरकर, श्रीकांत गावडे,महिला मोर्चा उपाध्यक्ष पल्लवी गाडगीळ, आय टी सेल च्या संयोजिका कल्याणी खर्डेकर,माणिकताई दीक्षित,वैभवजी जमदाडे,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संदीप खर्डेकर यांनी स्वागत, मंजुश्री खर्डेकर यांनी प्रास्ताविक, निलेश गरुडकर यांनी सूत्रसंचालन तर राजेंद्र येडे यांनी आभार प्रदर्शन केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App