पत्नीपासून विभक्त मुंबईत राहत असलेल्या पतीने पुण्यात येऊन आठ वर्षाच्या चिमुरडयावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे -पत्नीपासून विभक्त मुंबईत राहत असलेल्या पतीने पुण्यात येऊन आठ वर्षाच्या चिमुरडयावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सिंहगड राेड पाेलीस ठाण्यात पिडित मुलाच्या आईने व पिडित मुलाने तक्रार दिल्यानंतर पाेलीसांनी मुंबईतील बाेरीवली येथे राहणाऱ्या ५१ वर्षीय पित्यावर गुन्हा दाखल केला आहे.Father raped the eight years boy, crime registered in Sinhagad road police station
संबंधित पिता हा मुंबईत नाेकरी करत असून ताे मागील वषी दिवाळीनंतर पुण्यातील घरी आला हाेता. त्याने राहते घराचे परिसरात येवुन आठ वर्षाचा मुलगा एकटा असल्याचे पाहून त्याच्यावर शारिरिक अत्याचार करुन त्याच्या हाताला व पायाला कसले तरी इंजेक्शन देऊन त्यास जीवे मारण्याची धमकि दिली हाेती. याप्रकरणी घडलेला प्रकार पिडित मुलाने आईला सांगितल्यानंतर त्यांनी पाेलीसांकडे धाव घेत लैंगिक अत्याचार करणाऱ्या पित्या विराेधात तक्रार दाखल केली आहे. सिंहगड राेड पाेलीस याबाबत पुढील चाैकशी करत आहे.
नातेवाईकाकडून चिमुरडीवर अत्याचार
वाघाेली परिसरात राहण्यास असलेल्या एका कुटुंबातील १० वर्षाच्या मुलीवर नातेवाईक असलेल्या ४८ वर्षीय इसमाने जबरदस्तीने शारिरिक संबंध राहत्या घरात केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी सुनील उत्तम जाधव (वय-४८, रा.सणसवाडी, ता.शिरुर,पुणे) या आराेपीला पाेलीसांनी अटक केली आहे. याबाबत पिडित मुलीच्या ३५ वर्षीय आईने लाेणीकंद पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संबंधित तक्रारदार महिलेस तीन मुले असून त्या घरात नसताना त्यांचा आराेपी नातेवाईक घरी आला. त्याने तीन्ही मुलांना खावु आणण्याकरिता पैसे देवून एक मुलगा व एक मुलगी यांना घराबाहेर पाठवले. त्यानंतर दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीसाेबत जबरदस्तीने शारिरिक संबंध ठेवले.
आईवडीलांना मारण्याची धमकी देऊन मुलीवर बलात्कार
घरा समाेर राहत असलेल्या एका इसमाने समाेरील घरातील १६ वर्षीय मुलीस एकटी असल्याचे पाहून तिला गाठून त्याचे घरी बाेलवले. त्यानंतर जबरदस्तीने तिला डांबून ठेवत तिला धमकी देवून तुझ्या आईवडीलांना मारुन टाकीन असे सांगत तिचे साेबत शारिरिक संबंध करत बलात्कार केल्याचा प्रकार हडपसर परिसरात मांजरी येथे घडला आहे.
याप्रकरणी आराेपी युवराज बंडगर याचे विराेधात पाेलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. आराेपीने १६ वर्षीय मुलीस आपल्या दाेघात प्रेम प्रकरण असल्याचे तुझ्या पालकांना सांगुन तुझी बदनामी करेल अशी वेळाेवेळी धमकी देऊन तिला जबरदस्तीने घरात काेंडुन ठेवुन शारिरिक संबंध केल्याचे पिडित मुलीच्या आईने तक्रारीत सांगितले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App