शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित; शिंदे – फडणवीस सरकारने मान्य केल्या 70 % मागण्या


प्रतिनिधी

मुंबई : शेतकऱ्यांच्या 70 % मागण्या झाल्याने किसान मोर्चा स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा आमदार जे. पी. गावित यांनी केली आहे. शेतकरी वाशिंदमधल्या मैदानात ठाण मांडून होते. यावेळी आंदोलन शेतक-यांना भेटण्यासाठी जिल्हाधिकारी याठिकाणी दाखल झाले होते. त्यांनी शेतक-यांशी चर्चा केली. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. Farmers’ agitation postponed

नाशिक जिल्ह्यातून 14 मार्च रोजी मुंबईच्या दिशेने निघालेला शेतकरी लाॅंग मार्च शहापूरजवळ पोहोचललेला असताना काही मागण्या मान्य झाल्यानंतर शेतक-यांनी आपले आंदोलन मागे घेण्याबाबत सकारात्मकता दाखवली होती. शुक्रवारी राज्य सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर शेतकरी आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

जर शेतक-यांबाबत जे निर्णय घेतले आहेत. त्याची अंमलबजावणी झाली नाही तर हा मोर्चा पुन्हा विधिमंडळावर धडकेल, असा इशारा देण्यात आला आहे.

Farmers’ agitation postponed

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”