‘राज्याला रेमडेसिवीर पुरविणारयाचा छळ होऊ नये, यासाठीच पोलिस स्थानकात गेलो..’, रिबेरोंच्या लेखाला उत्तर देताना फडणवीसांनी उघड केला त्या रात्रीतील घडामोडींचा घटनाक्रम Fadnavis replied to Julio Ribeiro that I went police station to stop victimization of person, who is helping State government
विशेष प्रतिनिधी
मुंबई : माजी मुख्यमंत्र्याने पोलिस ठाण्यात जावे की नाही, यासंदर्भात मी अतिशय विचारपूर्वक हा निर्णय घेतला. सरकार ज्याला स्वतःहून संपर्क करीत नाही आणि आमच्या एका कॉलवर जो राज्याला मदत करतो आहे, त्या व्यक्तीचा गलिच्छ राजकारणासाठी विनाकारण छळ होऊ नये, हा एकमेव हेतू पोलिस ठाण्यात जाण्याचा होता. जाण्यापूर्वी मी मुंबई पोलिस आयुक्तांशी कितीतरी वेळा संपर्क साधला होता, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
शेवटी एसएमएसवरून त्यांना मी पोलिस स्थानकात जात असल्याचे कळविले. तरीदेखील महाविकास आघाडीच्या फेक नरेटिव्ह गँगने खोटे नाटे व्हिडीओ तयार केले. असल्या गलिच्छ राजकारणाला मी घाबरणार नाही, अशी टिप्पणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांच्या लेखावर आपली भूमिका स्पष्ट करणारा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लेख दि. २७ एप्रिल रोजी इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रकाशित झाला आहे. ज्युलिओ रिबेरो यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीचे कौतूक करीत असतानाच रेमडेसिवीर प्रकरणात पोलिस ठाण्यात जाण्याच्या त्यांच्या कृतीवर आक्षेप घेतला होता. त्यावर फडणवीस यांनी प्रथमच त्या रात्री घडलेला संपूर्ण घटनाक्रम उघड केला आहे.
फडणवीस यांच्या लेखातील प्रमुख मुद्दे असे :
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App