राज्यपालांची भेट घेऊन फडणवीसांची फ्लोअर टेस्टची मागणी; बंडखोर आमदार 30 जूनला मुंबईत परतण्याची आणि त्याच दिवशी बहुमत चाचणीची शक्यता

वृत्तसंस्था

मुंबई : महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी राज्यपाल भवन गाठले. चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन हेही त्यांच्यासोबत होते.Fadnavis demands floor test after meeting Governor; The rebel MLA is expected to return to Mumbai on June 30 and face a majority test on the same day

फडणवीस मंगळवारी दुपारी चार्टर विमानाने दिल्लीला गेले होते. तेथे त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. सूत्रांच्या हवाल्याने असे सांगण्यात येत आहे की, 30 जून म्हणजेच गुरुवारी शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटीहून मुंबईत परत येऊ शकतात.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 अपक्ष आमदारांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या अधिकृत ईमेल आयडीवर मेल पाठवून तातडीने फ्लोअर टेस्ट घेण्याची मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यपालांची भेट घेऊन यावर पुढील कारवाईची मागणी केली आहे.

उद्धव यांचे बंडखोरांना भावनिक आवाहन

इकडे उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी बंडखोर आमदारांना हृदयस्पर्शी आवाहन केले. ते म्हणाले- या एकत्र बोलूया. तुम्ही परत या. त्याचवेळी बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी उद्धव यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल केला आहे. शिंदे म्हणाले- तुमचा पुत्र आणि प्रवक्ते शिवसैनिकांना शिव्या देत आहेत आणि तुम्ही एकजुटीचे बोलत आहात.

उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला उत्तर देताना शिंदे यांनी सोशल मीडियावर लिहिले- एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं,नाल्याचीघाण,रेडा,कुत्रे,जाहील व मृतदेह म्हणायचे,त्यांचा बाप काढायचा तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी मविआसरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची,याचा अर्थ काय?”

Fadnavis demands floor test after meeting Governor; The rebel MLA is expected to return to Mumbai on June 30 and face a majority test on the same day

महत्वाच्या बातम्या