Fadanavis Police Inquiry : देवेंद्र फडणवीसांची घरात पोलीस चौकशी; पोलीस नोटिशीची महाराष्ट्रभर होळी!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदली घोटाळा बाहेर काढणाऱ्या विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या घरामध्ये पोलीस चौकशी सुरू आहे, तर राज्यभर यामध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन पोलीस नोटिशीची होळी पेटवली आहे. Fadanavis Police Inquiry: Police interrogation at Devendra Fadnavis’ house; Holi of police notice all over Maharashtra !!

देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशी विरोधात भाजपने राज्यभर जोरदार आंदोलन चालवले आहे. राज्यातल्या प्रत्येक शहरांमध्ये आणि गावांमधून भाजपाचे कार्यकर्ते स्थानिक पातळीवर चौकात जमून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी भाजपची सर्व संघटना एकजुटीने उभी असल्याचे दाखवण्यासाठी पोलिसांच्या नोटिशीची होळी पेटवून ठेवली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी पुण्यात भाजप मुख्यालयासमोर पोलीस नोटिशीची होळी केली. यावेळी भाजपच्या हजारो कार्यकर्त्यांनी तिथे ठाकरे – पवार सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

– चांद्यापासून बांद्यापर्यंत आंदोलन

अशाच प्रकारचे आंदोलन सांगली, सातारा, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, औरंगाबाद, जालना, सोलापूर, उस्मानाबाद, नागपूर, विदर्भात अमरावती, वाशीम, यवतमाळ आदी शहरांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी या प्रत्येक आंदोलनाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशीच्या निमित्ताने संपूर्ण भाजप यांच्या बाजूने एकवटल्याचे चित्र निर्माण करण्यात भाजपचे नेते आणि कार्यकर्ते यशस्वी झाले आहेत.

– पवारांचाच फंडा त्यांच्यावर उलटला

विस्कळीत राष्ट्रवादीला एकवटण्यासाठी जो राजकीय फंडा शरद पवार यांनी ईडीच्या न आलेल्या नोटीशीचीच्या वेळी वापरला होता, तोच राजकीय फंडा आज भाजपचे कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या घरातच पोलीस चौकशी सुरू असताना राज्यभर वापरताना दिसत आहेत.

Fadanavis Police Inquiry: Police interrogation at Devendra Fadnavis’ house; Holi of police notice all over Maharashtra !!

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती