प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळातला सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमधला भ्रष्टाचार बाहेर काढणाऱ्या विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा पोलीस त्यांच्या सागर बंगल्यात जबाब नोंदवत आहेत, तर दुसरीकडे भाजपने महाराष्ट्रभर नोटीस होळी आंदोलन पेटवले आहे.Fadanavis Police Inquiry
मात्र या आंदोलनावरून शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांची साधी चौकशी सुरू आहे. पोलिस त्यांच्या बंगल्यावर जाऊन चौकशी करत आहेत. मग भाजपने आंदोलनाचा तमाशा का मांडला आहे?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे?
– जबाब नोंदणी सुरू
आज दुपारी 12 वाजता वरिष्ठ पोलीस अधिकारी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. सध्या त्यांचा जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. मात्र, त्याच वेळी महाराष्ट्रभर भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन करत पोलिसांच्या नोटिशीची होळी केली आहे. अनेक नेत्यांनी जोरदार प्रतिक्रिया व्यक्त करून महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारचा निषेध केला आहे.
– कायद्यापेक्षा मोठे लोक
त्यावर संजय राऊत यांनी एक ट्विट करत भाजपलाच सवाल केले आहेत. महाविकास आघाडीतील मंत्री आणि आमदार यांच्या मागे केंद्रीय तपास संस्थांनी चौकशीचा ससेमिरा लावला आहे. मंत्री आणि आमदार चौकशीला सामोरे गेले आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस यांची साधी पोलीस चौकशी सुरू असताना एवढा तमाशा का सुरू आहे?, असा सवाल संजय राऊत यांनी ट्विट मधून केला आहे. काही लोक स्वतःला कायद्यापेक्षा मोठे समजू लागले आहेत अशी खोचक टीकाही या ट्विटमध्ये करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी देखील संजय राऊत यांच्या या भेटला व्यक्तीला दुजोरा दिला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App