प्रतिनिधी
पुणे : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा “पेन ड्राईव्ह बॉम्ब” फोडल्यानंतर सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या बाबतीत आणखी एक जोरदार “धमाका” झाला आहे. प्रवीण चव्हाण यांनी ज्या तेजस मोरेवर भिंतीवरच्या घडाळ्यात छुपा कॅमेरा बसून स्टिंग ऑपरेशन केल्याचा आरोप केला होता, त्या तेजस मोरे यानेच प्रवीण चव्हाण यांच्यावरच पलटवार केला आहे. Fadanavis Pendrive Bomb girish mahajan pravin chavan tejas more
एवढेच नाही तर तेजस मोरे यांनी एक धमाकेदार खुलासा केला आहे गिरीश महाजन यांना अडकवण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हेच प्रवीण चव्हाण यांना सांगत होते, असा “धमाका” तेजस मोरे यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे. इतकेच नाही तर गिरीश महाजन यांच्याशी संबंधित भोईटे यांच्याकडे पुणे पोलिसांनी बनावट पुरावे प्लँट केले असा खळबळजनक दावा तेजस मोरे यांनी केला आहे.
– तेजस मोरेचे धमाके
प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात भिंतीवरचे घड्याळ आणि त्या घड्याळ्यात छुपा कॅमेरा मी बसवलेला नाही. प्रवीण चव्हाण खोटे बोलत आहेत. प्रवीण चव्हाण यांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. मी घड्याळ बसवले असेल तर प्रवीण चव्हाण यांनी तसे पुरावे द्यावेत.
– गिरीश महाजन यांना खोट्या आरोपांखाली अडकवण्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि एकनाथ खडसे हे प्रवीण चव्हाण यांना सांगत होते असा खळबळजनक दावाही तेजस मोरेने केला आहे.
– प्रवीण चव्हाण यांच्या ऑफिसमध्ये झालेल्या स्टिंग ऑपरेशनबद्दल त्यांनी एबीपी माझाशी बोलताना खुलासा केला होता की त्यांचे अशील तेजस मोरे यांनी भेट दिलेल्या घडाळ्यातील छुप्या कॅमेऱ्यातून हे स्टिंग ऑपरेशन करण्यात आल्याचा दावा प्रवीण चव्हाण यांनी केला होता. प्रवीण चव्हाण यांच्या या आरोपांवर आता तेजस मोरेने स्पष्टीकरण दिले आहे.
– प्रवीण चव्हाणांनी पुरावे द्यावेत
प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात घड्याळ आणि त्यामधे छुपा कॅमेरा मी बसवला नाही. परंतु, प्रवीण चव्हाण यांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. मी घड्याळ बसवले असेल तर प्रवीण चव्हाण यांनी तसे पुरावे द्यावेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जारी केलेल्या ज्या व्हिडीओमधे मी उपस्थित आहे, त्यातील प्रत्येक शब्द खरा आहे.
– प्रवीण चव्हाण यांनी मला जामीन मिळवून दिला आहे. त्यामुळे मी त्यांना देव मानत होतो. त्यानंतर मी त्यांना त्यांच्या कार्यालयात मदत करु लागलो. माझे इंग्रजी चांगले असल्यामुळे विविध खटल्यातील जबाब ते सांगतील त्या पद्धतीने मी इंग्रजीत टाईप करून देत होतो. अनेक खटल्यांचे जबाब मी नोंद केले आहेत.
– बनावट पुरावे प्लँट
– भाजप नेते गिरीश महाजन यांच्या प्रकरणाशी संबंधित जबाब देखील मी नोंद केले आहेत. परंतु, पुणे पोलीस गिरीश महाजन यांच्याशी संबंधित भोईटे यांच्या घरी छापा घालण्यासठी गेल्यापासून माझे मतपरिवर्तन झाले. कारण पुणे पोलिसांनी भोईटे यांच्या घरी बनावट पुरावे प्लँट केले होते.तेव्हापासून मी प्रवीण चव्हाण यांच्यापासून दूर गेलो.
– पुणे पोलिसांचे बिल गुगल पे वरून
“जळगावला गेलेल्या पुणे पोलिसांच्या जेवणाचे बिल देखील मी गुगल पे वरुन भरले आहे. प्रवीण चव्हाण यांच्या सांगण्यावरून पुणे पोलिसांकडून बनावट पुरावे तयार करुन ते भोईटेंच्या घरात प्लँट करण्यात आले. काहीही करुन गिरीश महाजन यांना “मोक्का” लावण्याचा पुणे पोलिसांचा प्रयत्न होता
– अनिल देशमुख, एकनाथ खडसे
गिरीश महाजन यांना अडकवण्यासाठी आधी अनिल देशमुख आणि नंतर एकनाथ खडसे प्रवीण चव्हाण यांना सांगत होते. मी गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांना कधीच भेटलेलो नाही. प्रविण चव्हाण हे मला खोट्या गुन्ह्यात अडकवतील ही भीती आहे. त्यामुळे मी लवकरच माध्यमांसमोर प्रत्यक्षात येणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App