विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : मराठा ओबीसी आरक्षणानंतर आता मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. मुस्लिम आरक्षणावरुन केंद्राकडे बोट दाखवत विधानसभेत नवाब मलिक म्हणाले मुस्लिम आरक्षणाचा निर्णय घेतला तरी तो पुढे जाऊ शकत नाही.Face-to-face: Nawab Malik’s boat to the center on Muslim reservation – ‘Is this the business of making Muslims into owls?’ Imtiaz Jali’s speech .
त्यांच्या याच प्रतिक्रियेवर उत्तर देतांना, आरक्षणावरून मुस्लिमांना उल्लू बनवण्याचं काम सुरू असून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मुस्लिमांना उत्तर द्यावे लागेल अशा शब्दांत एमआयएम नेते आणि खासदार इम्तियाज जलील यांनी नवाब मलिकांची कानउघडणी केली आहे.
सत्तेत असताना सुद्धा जर निर्णय घेत नसाल तर मुस्लिम समाजाला आता सर्व काही कळत असल्याचा टोला जलील यांनी मालिकांना लगावला आहे.
एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देतांना जलील म्हणाले की, नवाब मलिक यांनी विधानसभेत दिलेली माहिती म्हणजे, मुस्लिमांना उल्लू बनवण्याचा धंदा आहे. मलिक म्हणतात पाच टक्के नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याबाबत आम्ही विचार करत असल्याचे म्हणत आहे.
पण आमचं म्हणणं आहे की, हायकोर्टाने सांगितल्याप्रमाणे शिक्षणात पाच टक्के आरक्षण देण्यास कोणतीही अडचण नाहीये. त्यामुळे ठाकरे सरकार शिक्षणाबाबतचं आरक्षण का लागू करत नाही?, असा प्रश्न जलील यांनी उपस्थित केला.
पुढे बोलताना जलील म्हणाले की, कोर्टाने दिलेला निर्णय हे सरकार लागू करत नाहीये आणि मुस्लिमांना उल्लू बनवण्याचे काम करत आहेत. 2014 मध्ये कोर्टाने मुस्लिमांना शिक्षणात 5 टक्के आरक्षण देण्याचं सांगितले होते. त्यासाठी आणखी किती दिवस लागणार? असा सवाल जलील यांनी केला.
सत्तेत असताना सुद्धा जर निर्णय घेत नसाल तर मुस्लिम समाजाला आता सर्व काही कळत असल्याचा टोला जलील यांनी मालिकांना लगावला.तर मुस्लिम आरक्षणावर मालिकांनी केंद्राकडे बोट दाखवल्याच्या प्रश्नाला उत्तर देतांना जलील म्हणाले, हे पूर्णपणे दिशाभूल करण्याचं काम सुरु आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांना असं वाटतं आहे की, मुस्लिमांना काही अक्कल नसून त्यांना काहीच कळत नाही. पण जेव्हा तुम्ही 2014 मध्ये अध्यादेश आणला होतं तेव्हा सुद्धा 50 टक्क्यांची मर्यादेचा नियम होता. तेव्हा कसं शक्य झालं होतं?,
मग नवाब मलिक सभागृहात आता कोणत्या तोंडाने या मर्यादेचा दाखला देऊन मुस्लिमांना शैक्षणिक आरक्षण नाकारत आहेत? असा सवाल देखील इम्तियाज यांनी केला. काॅंग्रेस-राष्ट्रवादीला मुस्लिमांना याचे उत्तर द्यावे लागेल, असेही इम्तियाज यांनी ठणकावून सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App