भोसरी हे ठिकाणाहून अनेक प्रवासी जुन्नर याठिकाणी जाण्यास उपलब्ध असतात. त्यामुळे आपल्या बसचे आर्थिक नुकसानही होणार नाही.Extend the PMP route from Bhosari to Junnar; Demand of MLA Mahesh Landage
विशेष प्रतिनिधी
पुणे : भोसरी ते जुन्नर या मार्गावर पुणे महानगर परिवहन महामंडळाचे पीएमपीनवीन बस सेवा सुरु करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. याबद्दल त्यांनी पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मी नारायण मिश्रा यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात आमदार लांडगे यांनी म्हटले आहे की, पुणे जिल्हात स्वराज्याचे प्रतिक असलेला शिवनेरी किल्ला जुन्नरमध्ये आहे.पुणे शहरातून अनेक पर्यटक शिवनेरी किल्ल्याला मोठ्या प्रमाणात भेट देत असतात.
तसेच पिंपरी चिंचवड शहरातील अनेक नागरिक व महिला हे मंचर, जुन्नर व आंबेगाव या ठिकाणी नोकरी निमित्त ये-जा करतात. या मार्गावर खाजगी वाहनातून प्रवास करणे महिलांना व विद्यार्थ्यांना जोखमीचे असून प्रवास करते वेळी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
पुढे आमदार महेश लांडगे म्हणाले की , सध्या आपल्या विभागामार्फत मंचर पर्यंतच बससेवा उपलब्ध असून,पुढील प्रवास करताना इतर खाजगी वाहनां मधून प्रवास करावा लागतो. भोसरी हे ठिकाणाहून अनेक प्रवासी जुन्नर याठिकाणी जाण्यास उपलब्ध असतात. त्यामुळे आपल्या बसचे आर्थिक नुकसानही होणार नाही. किल्ले शिवनेरी पायथ्यापर्यंत लवकरात लवकर यामार्गावर तात्काळ बससेवा सुरु करावी अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App