बिबवेवाडी येथील उच्चभ्रु सोसायटीत सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पुणे शहर बिबवेवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.येथील दोन पिडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. वेश्या व्यवसाय चालविणार्या दोघांना अटक करण्यात आली आहे. Exposed sex racket started in high society
विशेष प्रतिनिधी
पुणे : बिबवेवाडी येथील उच्चभ्रु सोसायटीत सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पुणे शहर बिबवेवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.येथील दोन पिडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. वेश्या व्यवसाय चालविणार्या दोघांना अटक करण्यात आली आहे.
महेंद्र ज्ञानाराम प्रजापती (वय ३४, रा. सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी, मुळ गाव सोजत, जि. पाली, राजस्थान), पांडुरंग लक्ष्मण शिंदे (वय ४६, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे अटक केलेल्या एजंटची नावे आहेत, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगांवकर यांना बिबवेवाडी येथील रासकर पॅलेस या उच्चभ्रु सोसायटीत वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार, पोलिसांनी एक बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली.त्यानंतर तेथे छापा टाकण्यात आला.तेथे वेश्याव्यवसाय करुन घेणार्या दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले.तसेच दोघा एजंटना अटक करण्यात आली.कारवाईच्या वेळी रोख ४ हजार रुपये, तीन मोबाईल, कंडोमची पाकिटे तसेच इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला.पिडित महिलांना हडपसर येथील रेस्क्यु फाऊंडेशन येथे ठेवण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App