अफवा पसरवणाऱ्या नवाब मलिकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, चंद्रकांत पाटलांची राज्यपालांकडे मागणी

Expel Nawab Malik from cabinet for spreading rumors against Center, Chandrakant Patil demands Governor

Chandrakant Patil : राज्यात कोरोना संसर्गाने हाहाकार माजवलेला आहे. यादरम्यान आघाडी सरकारने रेमडेसिव्हिर इंजेक्शन आणि ऑक्सिजन पुरवठ्यावरून केंद्र सरकारवर अनेक आरोप केले होते. आता केंद्रावर खोटे आरोप करून जनसामान्यांत असंतोष निर्माण केल्याबद्दल आणि अफवा पसरवल्याबद्दल राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिकांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. या मागणीचे पत्रही त्यांनी राज्यपालांना पाठवले आहे. Expel Nawab Malik from cabinet for spreading rumors against Center, Chandrakant Patil demands Governor


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यात कोरोना संसर्गाने हाहाकार माजवलेला आहे. यादरम्यान आघाडी सरकारने रेमडेसिव्हिर इंजेक्शन आणि ऑक्सिजन पुरवठ्यावरून केंद्र सरकारवर अनेक आरोप केले होते. आता केंद्रावर खोटे आरोप करून जनसामान्यांत असंतोष निर्माण केल्याबद्दल आणि अफवा पसरवल्याबद्दल राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिकांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. या मागणीचे पत्रही त्यांनी राज्यपालांना पाठवले आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, “केंद्राने महाराष्ट्राला रेमडेसिव्हिरचा पुरवठा करण्यास कंपन्यांना मनाई केल्याचा खोडसाळपणाचा व खोटा आरोप नवाब मलिकांनी ट्विटरवरून केला. मलिकांनी आपल्या आरोपांच्या समर्थनार्थ आतापर्यंत एकही पुरावा दिलेला नाही. त्यांनी केंद्र सरकारविरुद्ध असंतोष निर्माण केला, राज्याचे मंत्री असूनही केंद्राविरोधात असंतोष निर्माण करून घटनात्मक चौकटीला नुकसान पोहोचवले, कोरोना महामारीच्या काळात अफवा पसरवून जनतेत भीती निर्माण केली. त्यांच्या या अपराधाबद्दल राज्य सरकारचे घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपलांनी मलिकांची सरकारमधून हकालपट्टी करावी व त्यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा नोंदवून कायद्याच्या योग्य कलमांनुसार शिक्षा घडवावी.”

मलिकांविरुद्ध पोलिसांत तक्रार

नवाब मलिक यांनी रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या पुरवठ्यावरून केंद्र सरकारविरोधात अफवा पसरविल्याचा आरोप भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. भातखळकर यांनी याप्रकरणी मलिक यांच्याविरोधात दिंडोशी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

काय म्हणाले होते नवाब मलिक?

नवाब मलिक यांनी दोन दिवसांपूर्वी रेमडेसिव्हिरच्या तुटवड्यावरून केंद्र सरकारवर अनेक गंभीर आरोप केले होते. केंद्र सरकारने रेमडेसिव्हिर निर्यातीवर बंदी घातल्याने देशातील 16 निर्यातदारांना त्यांच्याकडे असलेल्या 20 लाख इंजेक्शन विक्रीला परवानगी मिळत नाहीये. केंद्र सरकारने यासाठी नकार दिल्याचा आरोप मलिकांनी केला होता. एवढेच नाही, तर महाराष्ट्राला पुरवठा केल्यास केंद्राने या कंपन्यांना लायसन्स रद्द करण्याची धमकी दिल्याचा आरोपही त्यांनी केला होता. तथापि, यानंतर केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया यांनी मलिकांचे हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे स्पष्ट केले होते. मलिकांना वास्तवाची जाणीव नाही, असेही त्यांनी नमूद केले होते.

Expel Nawab Malik from cabinet for spreading rumors against Center, Chandrakant Patil demands Governor

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात