विशेष प्रतिनिधी
मुंबई : पार्श्वगायिका लता मंगेशकर यांचे नुकतेच देहावसान झाले. लतादीदींना मानवंदना देण्यासाठी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वतीने त्यांच्यावरील साहित्याच्या संदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. Exhibition of the literature on Latadidi Tribute to Mumbai Marathi Library
जगविख्यात लतादीदी या स्वतः एक विद्यापीठ होत्या. त्यांच्यावर लेखन मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यातील वैशिष्टपूर्ण व निवडक साहित्य या संदर्शनात असणार आहे.
दिनांक ९ फेब्रुवारी, गुरुवारी, दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या, दादर पूर्व येथील संदर्भ विभागात सायंकाळी ठीक ४.३०वाजता या वैशिष्टपूर्ण संदर्शनाचे उद्घाटन होईल. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे उपाध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर व विद्याताई चव्हाण यांच्या हस्ते ते करण्यात येणार आहे.
याप्रसंगी कार्याध्यक्ष शीतल करदेकर, प्रमुख कार्यवाह रविंद्र गावडे व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. संदर्शन दि १५ फेब्रुवारी पर्यत सुरू रहाणार असून जास्तीत जास्त रसिक , वाचकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संदर्भ विभाग सचिव उमा नाबर यांनी केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App