Devendra Fadnavis Cousin Abhijeet Fadnavis Dies : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू अभिजित फडणवीस यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्युसमयी ते 54 वर्षांचे होते. नागपुरात राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिजीत फडणवीस हे माजी मंत्री भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस यांचे सुपुत्र होते. Ex CM LOP Devendra Fadnavis Cousin Abhijeet Fadnavis Dies of Heart attack in Nagpur Today
विशेष प्रतिनिधी
नागपूर : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू अभिजित फडणवीस यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्युसमयी ते 54 वर्षांचे होते. नागपुरात राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिजीत फडणवीस हे माजी मंत्री भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस यांचे सुपुत्र होते.
अभिजित फडणवीस यांचे आज (25 ऑगस्ट) सकाळी 9.30 वाजता निधन झाले. ते मागच्या काही दिवसांपासून आजारी असल्याची माहिती समोर आली आहे. नागपुरातच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अभिजीत माधवराव फडणवीस हे जगदंबा राईस मिलचे भागीदार होते. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस यांचे ते एकुलते एक सुपुत्र, तर विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू होते. त्यांच्या पश्चात मातोश्री, पत्नी, पुत्र तन्मय फडणवीस असा परिवार आहे.
Ex CM LOP Devendra Fadnavis Cousin Abhijeet Fadnavis Dies of Heart attack in Nagpur Today
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App