पर्यावरण पूरक सोसायटी मार्गदर्शन व प्रदर्शन संपन्न


पर्यावरणासाठी जोपर्यंत समाज्यातील विविध घटक एकत्र येत काम करणार नाहीत तोपर्यंत बदल घडणार नाहीत. पर्यावरणपूरक सोसायटी निर्माण होणे ही काळाची गरज निर्माण झालेली आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे – नागरिकांमध्ये सुसंवाद, शेजार्‍यांमध्ये जवळीकता नसेल तर त्याचा परिणाम सोसायट्यांवर पडतो. सोसायट्यांमधील वातावरण आणि भौगोलिक परिसर स्वच्छ व सुंदर असल्यास मनात विचार देखील चांगले येतात. पर्यावरणासाठी जोपर्यंत समाज्यातील विविध घटक एकत्र येत काम करणार नाहीत तोपर्यंत बदल घडणार नाहीत. पर्यावरणपूरक सोसायटी निर्माण होणे ही काळाची गरज निर्माण झालेली आहे. सोसायट्या व त्यांच्या परिसरातील घन कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर उर्जा प्रकल्प, सोसायटी विमा, स्वच्छता या विषयांवर गांभिर्याने विचार करणे आवश्यक असल्याचे मत पुणे महानगरपालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षणच्या उपायुक्त आशा राऊत यांनी व्यक्त केले. Environment friendly society is need of changing world environment

पुणे महानगरपालिका, स्वच्छ सर्वेक्षण, माझी वसुंधरा उपक्रमा अंतर्गत माय अर्थ फांउडेशन, महाराष्ट्र सोलर मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशन (मास्मा), पुणे जिल्हा सहकारी गृहसंस्था फेडरेशन आणि एन्वायारन्मेंट क्लब ऑफ इंडियाच्या माध्यमातून सोसायट्यांमध्ये पर्यावरण जनजागृती करण्याच्या उद्देशाने प्रदर्शन आणि मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरणपूरक प्रदर्शनामध्ये प्लास्टीकपासून इंधन निर्मिती, गांडूळ खत निर्मिती, सौर उर्जा उपकरणे, टाकाऊ वस्तूंपासून विविध उपयोगी वस्तू बनविणे असे विविध ३० संस्थांनी सहभाग घेतला होता. यावेळी पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली.

यावेळी राजेश मुथा, सुहास पटवर्धन, आरोग्य अधिकारी केतकी घाडगे, माय अर्थ फांउडेशनचे अध्यक्ष अनंत घरत, ललित राठी, पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे, बाबा इनामदार, मुकुंद शिंदे, सुनिल जोशी, अमोघ घवंडे, विशाल ठिगळे, तानाजी भोसले, विजय जोरी उपस्थित होते.

महाराष्ट्र सोलर मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशन (मास्मा)चे अध्यक्ष राजेश मुथा म्हणाले की, वैश्विक तापमान वाढ आणि पर्यावरण बदलाचा अनिष्ट परिणाम सर्वांना सोसावा लागत आहे. ग्लोबल वॉर्मिंगची वाढती समस्या लक्षात घेता प्रदुषणाची पातळी कमी करण्याची जबाबदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे. नैसर्गिकदृष्ट्या उपलब्ध असलेल्या स्त्रोतांचा वापर केल्यास प्रदुषण कमी होण्यास मदत होते. सौरऊर्जेचा विविध प्रकारे वापर करुन विद्युतनिर्मितीसाठी, अन्न शिजवणे, पाणी गरम करण्यासाठी होऊ शकतो. वॉटर हीटर, पवनचक्की, सोलर कुकर, फोटोहोल्टिक दिवे आणि पंप अशी साधने बाजारामध्ये उपलब्ध आहेत. आपल्याकडे वर्षभर भरपूर सूर्यप्रकाश उपलब्ध आहे. आपल्या आर्थिक उन्नतीसाठी सौर ऊर्जा उपकरणांचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतला पाहिजे. मात्र कमी पैशात मिळणारी उकरणे ही हलक्या दर्जाची असतात त्याच्या देखभालीचा आणि दुरुस्तीचा खर्च वाढतो. त्यामुळे चांगली सौर उपकरणे घेण्याकडे सोसायट्यांचा कल असावा.

Environment friendly society is need of changing world environment

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण