प्रतिनिधी
संभाजीनगर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा काैशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय यांच्या वतीने सोमवार दि. १७ ते २१ ऑक्टोबरदरम्यान ऑनलाइन पद्धतीने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा होणार आहे. १९ ऑक्टोबरला ऑफलाइन पद्धतीने हा मेळावा होईल. या रोजगार मेळाव्यात संभाजीनगर आणि नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्या सहभागी होणार आहेत. Employment fair from today for 1060 vacancies in companies of Sambhajinagar + Nashik; Join online
यामध्ये महिंद्रामध्ये विविध पदांच्या १०० जागा, डाटामॅक्टिक्स ग्लोबल सर्व्हिसेसमध्ये १०० पदे, मेडप्लस फार्मसीमध्ये ३०, नवभारत फर्टिलायझरमध्ये ३६ पदे, रेसमोसा एनर्जी इंडिया प्रा. लि.मध्ये २० पदे, महिंद्रा सीआयई स्टपिंग स्टेशनमध्ये १०० पदे, बाॅश लिमिटेडमध्ये १०० पदे, परफेक्ट प्रोटेक्शनमध्ये ५० पदे, युनिव्हर्सलमध्ये ९, युवाशक्ती फाउंडेशनमध्ये १५० पदे, बाॅम्बे इंटिलिजेंटसमध्ये ५५, व्हीआयपी इंडस्ट्रीजमध्ये १०, एसएमपीमध्ये २० अशा १३ नामांकित कंपन्यांची एकूण ७८० रिक्तपदांसाठी ऑफलाइन मेळाव्याद्वारे भरती केली जाणार आहेत. तर इतर ५ नामांकित कंपन्यांची २८० रिक्तपदांसाठी ऑनलाइन मेळाव्याद्वारे भरती प्रक्रिया होणार आहेत.
नाशिकला १९ ऑक्टोबर रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सातपूर येथे सकाळी ९ वाजेपासून ऑफलाइन मुलाखती घेतल्या जाणार आहे. ऑनलाइनसाठी skype, whatsapp यांच्यासह मोबाईल काॅलद्वारे पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेऊन रिक्त जागांसाठी निवड प्रक्रिया होईल. इच्छुकांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App