एकनाथ शिंदे – जितेंद्र आव्हाडांसमोरच शिवसेना-राष्ट्रवादीचे नगरसेवक – कार्यकर्ते एकमेकांना भिडले!!

प्रतिनिधी

ठाणे : महाराष्ट्रात राज्यपातळीवर महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत जरी सख्य असले तरी ठाण्यात मात्र दोन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते एकमेकांना पाण्यात पाहतात. ठाण्यात कळवा येथील खारीगावमध्ये उड्डाणपुलाच्या लोकार्पणाचा कार्यक्रमात याचा प्रत्यय आला. त्यावेळी महाविकास आघाडीतील दोन पक्षातील नगरसेवक आणि कार्यकर्ते एकमेकांशी अक्षरशः भिडले आणि त्यांच्या हमरीतुमरी झाली.Eknath Shinde – Shiv Sena-NCP corporators in front of Jitendra Awhad – activists clashed with each other

विशेष म्हणजे शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ शब्द राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर हा प्रकार घडला. शेवटी नमते घेऊन जितेंद्र आव्हाड यांना महाविकास आघाडी जिंदाबाद अशी व्यासपीठावरून जाहीर घोषणा द्यावी लागली.हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये या विषयावर खूपच बाचाबाची झाली. यानिमित्ताने हे दोन्ही पक्ष राज्यात जरी एकत्र असले, तरी स्थानिक पातळीवरची खदखद पुन्हा बाहेर आली आहे, या सगळ्या वादाला सुरूवात बॅनरबाजीवरून झाली.

कळव्यातील खारीगाव उड्डाणपुलाच्या लोकार्पणावरून श्रेयवाद उफाळून आला. सुरुवातीला फक्त शिवसेनेचे बॅनर दिसत होते, त्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले, काही वेळातच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही बॅनर लावले. राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांनी बॅनर लावल्यानंतर मोठा हायव्होल्टेज ड्रामा सुरू झाला.

हा वाद फक्त बॅनरबाजीवर थांबला नाही, तर थेट हमरातुमरीवर पोहोचला. पाठपुरावा आम्ही केला आणि बॅनरबाजी तुमची असे आरोप दोन्हीकडील कार्यकर्त्यांनी एकमेकांवर केले. कार्यकर्ते तर एकमेकांना भिडलेच, मात्र नगरसेवकही मागे राहिले नाहीत, यावेळी नगरसेवकांमध्येही जोरदार बाचाबाची झाली. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक उमेश पाटील आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक महेश साळवी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झडली.

ठाण्यातील खारीगाव उड्डाणापुलाचे लोकार्पण ठाण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री जितेंद्र आव्हाडही व्यासपीठावर उपस्थित होते, मात्र कार्यकर्त्यांना याचेही भान राहिले नाही. अखेर आव्हाड यांना महाविकास आघाडीचा विजय असो, अशा घोषण द्याव्या लागल्या.

Eknath Shinde – Shiv Sena-NCP corporators in front of Jitendra Awhad – activists clashed with each other

महत्त्वाच्या बातम्या