एकनाथ शिंदे बंड : उद्धव ठाकरेंचा राजीनामा नको, राष्ट्रवादी – काँग्रेसशी संबंध तोडा!!; दीपक केसरकरांनी मांडली शिंदे गटाची भूमिका


प्रतिनिधी

मुंबई : बंड करताना एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या भूमिकेत सातत्य ठेवत त्यांच्या गटाने पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या बाजूचे नेते एकनाथ शिंदे यांच्या गटावर शिवसेना हायजॅक केल्याचा आरोप करत आहेत. परंतु राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनीच शिवसेना हायजॅक केली आहे, असा प्रत्यारोप एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या वतीने दीपक केसरकर यांनी केला आहे. आम्हाला उद्धव ठाकरे यांचा राजीनामा नको आहे पण काँग्रेस-राष्ट्रवादी ही संबंध तोडले पाहिजेत आणि आपली नैसर्गिक मैत्री ज्यांच्याशी आहे त्या भाजपबरोबर सरकार बनवले पाहिजे ही आमची भूमिका आहे याचा पुनरुच्चार केसरकर यांनी केला आहे. Eknath shinde group demands, snap ties with NCP and Congress

गुवाहाटीमध्ये दीपक केसरकर यांनी एकनाथ शिंदे गटाची पहिली पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर भूमिका जाहीर केली आहे.

एकनाथ शिंदे गटाने दीपक केसरकर यांची शिंदे गटाच्या प्रवक्तेपदी निवड केली आहे. आमच्याकडे बहुमत आहे. आमचाच पक्ष शिवसेना असे म्हणत बंडखोर एकनाथ शिंदे गटाने मूळ शिवसेनेवर दावा केला आहे, तर आम्ही संजय राऊत यांना गंभीरपणे घेत नाही असे म्हणत त्यांनी राऊतांवर तोफ डागली आहे. आम्हाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा राजीनामा नकोय, तर केवळ भाजपसोबत सरकार हवे आहे, अशी मागणी शिंदे गटाने केली आहे.

दीपक केसरकरांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

– शिवसेना म्हणजे आम्हीच

आम्हीच शिवसेना आहोत. आम्ही विधिमंडळात निवडून आलोत. आम्ही कशाला आमचाच पाठिंबा काढू. आमचे नेते एकनाथ शिंदे आहेत. त्यांना कुणीतरी काढण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेला कोणीही हायजॅक केले नाही. आम्ही शिवसेनेच्या विचाराचे, बाळासाहेबांच्या विचाराचे. आमचा पक्ष, आमच्या आमदारांना पराभूत करण्याचा आणि हायजॅक करण्याचा प्रयत्न केला गेला.

– पक्षांतर बंदी कायदा लागू नाही

पक्षांतरबंदी कायदा लागू होऊच शकत नाही. ओढून-तोडून कायदा लागू करणे लोकशाहीची हत्या आहे. आम्ही महाराष्ट्रात आले पाहिजे, पण राऊत म्हणतात रस्त्यावर उतरणार. अशावेळेला आठवण करून द्यायचीय. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलीय. तेव्हा कोणाच्याही बद्दल आकस न बाळगता कर्तव्य पार पाडावे. कायद्याचे पालन पार पाडावे.

आमच्याकडे बहुमताचा आकडा आहे. मात्र, आम्ही शिवसेना आहोत. आम्ही अजून कसलाही दावा केला नाही. आम्ही इतकेच म्हणतोय, आम्ही शिवसेनेचे सदस्य आहोत. शिवसेनेत राहणार आहोत. सोळा ते सतरापेक्षा जास्त लोक त्यांच्याकडे नाहीत. त्यांच्याकडे बहुमत नाही. माझी मुख्यमंत्र्यांना एक विनंती आहे, आज जे महाराष्ट्रात दंगे सुरू आहेत. त्यांनी एक आवाहन केले, तर ते बंद होतील. हे दंगे त्यांनी थांबवावेत, असे अवाहन दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.

– यामागे कुणीही नाही

आम्हाला कोणीही असे सांगितले नाही की, असे तुम्ही करा. आम्हाला एकनाथ शिंदे हे स्वत: उद्धव ठाकरेंनी नेते म्हणून दिले आहेत. दोन तृतीयांश बहुमताचा जो मुद्दा आहे तो घटनात्मक आहे. ते बहुमत आमच्याकडे आहे. 55 आमदारांचा नेता बदलायचा असेल तर तो 16 लोकांना बदलता येत नाही. जो काही निर्णय उपाध्यक्ष झिरवाळांनी दिला आहे त्याला आम्ही कोर्टात आव्हान देणार आहोत.



आम्ही पक्षाचे वेगळं नाव मागितले नाही

तुम्हाला जर पक्षाने विधानसभेसाठी व्हिप काढला तर आणि तुम्ही गैरहजर राहिलात तर तो व्हिप लागू होतो. बाहेर व्हिप लागू होत नाही. आमच्यापैकीच एक जण गटनेता होतो, प्रतोद होतो, अध्यक्ष होतो, उपाध्यक्ष होतो. आम्ही कुणीही पक्ष सोडलेला नाही, जी रस्त्यावर उतरण्याची भाषा केली जात आहे, ती अत्यंत चुकीची आहे. माझे तमात शिवसैनिकांना आवाहन आहे की, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. आम्ही तुम्हाला खात्री देतो की, आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेणार

– नोटीसीचे कारण चुकीचे

आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न अयोग्य आहे. आम्हाला जी 48 तासांची नोटीस बजावली आता शनिवार, रविवार आहे. एवढी कोणतीही इमर्जन्सी नव्हती. त्यांनी नियमाप्रमाणे एका आठवड्याची मुदत द्यायला हवी होती. यासाठी आम्ही उपाध्यक्षांना विनंती करू. मूळात या कारणासाठी अशी नोटीस काढता येणार नाही. तरीही आम्ही त्यांच्याजवळ आमचे म्हणणे रीतसर मांडू. असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.

– शिवसेना वाचवण्यासाठी प्रयत्न

जिथे शिवसेना दोन नंबरला होती, तिथे राष्ट्रवादीला ताकद दिली जात होती, म्हणून शिवसेना वाचवण्यासाठी आमचा आग्रह होता. त्यांनी तसे आश्वासन द्यायला पाहिजे होते की, तुमच्या उमेदवाराला धक्का लागणार नाही. उद्धव ठाकरे पुढेही आमचे ऐकतील ही आमची अपेक्षा आहे.

– मोदींचे उद्धव ठाकरेंवर प्रेम

– पंतप्रधान नरेंद्र मोदींना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल खूप प्रेम आहे. म्हणून शिवसेना आणि भाजपने एकत्र आले पाहिजे अशी मागणी शिंदे गटाने केली आहे. शिवसैनिकांना मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंकडून खूप अपेक्षा होत्या मात्र त्या पूर्ण झाल्या नाहीत. महाविकास आघाडीत शिवसेनेला महत्त्व ठेवले नाही.

– राष्ट्रवादीकडे हात पसरावे लागतात

-“सगळी चांगली खाते काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे, आमच्याकडे एकही चांगले खाते नाही. आमची कामे घेऊन गेल्यावर त्यांच्यापुढे हात पसरावा लागतो. हा माणूस मुख्यमंत्र्यांचा आहे, शिवसेनेचा आहे तर त्यांना राष्ट्रवादी वाले महत्त्व देत नाहीत. ही ठिणगी राज्यसभेपासून पडली, राज्यसभेत जी मते फुटली, ती ना शिवसेनेची होती ना शिवसेनेला सपोर्ट करणाऱ्यांची होती. त्या फुटलेल्या मतांची मीमांसा व्हायला पाहिजे होती.

– आमचा खर्च करण्यास आम्ही सक्षम

प्रत्येक आमदाराला चांगला पगार आहे, यामुळे तो स्वत:चा खर्च करू शकतो. आम्ही पैसे भरून येथे राहतो, आमचा खर्च कुणीही उचलत नाही. भाजप आमचा खर्च का करेल? तुम्ही भाजपचे नाव का जोडता? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला आहे. आम्ही कुठल्याही पक्षात उभे राहून निवडून आलेलो आहोत.

Eknath shinde group demands, snap ties with NCP and Congress

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात