प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोन वेगवेगळ्या सकारात्मक राजकीय शिष्टाईंमुळे आज दोन आंदोलने मागे घेतली गेली. एकनाथ शिंदे यांच्या शिष्टाईमुळे अंगणवाडी सेविकांनी आपले आंदोलन मागे घेतले, तर देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईमुळे वीज कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. Eknath Shinde – Devendra Fadanavis diplomacy; anganwadi Sevika and maharashtra electricity company employees agitations ended
अंगणवाडी सेविकांच्या न्याय मागण्यांबाबत सकारात्मक विचार केला जाईल. त्यांना दिलासा मिळेल असेच प्रयत्न करू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंगणवाडी सेविकांना सांगितले. शिंदे यांच्या या सकारात्मक प्रतिसादामुळे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने आंदोलन मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला.
विजेअभावी नागरिकांचे हाल, कारखाने बंद; संपकरी वीज कर्मचाऱ्यांना मेस्मा कायदा लागू; राज्य सरकारची कठोर भूमिका
या आंदोलकांच्या शिष्टमंडळांने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळातील प्रतिनिधींचे म्हणणे तपशीलवार ऐकून घेतले. या सर्व मुद्यांबाबत लवकरच व्यापक बैठक बोलावण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. या बैठकीत अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्याचे निश्चित करण्यात आले. यात अंगणवाडी केंद्रांसाठीची जागा, सेविका आणि मदनतीस यांचे मानधन, रिक्त जागा, ऑनलाईन डाटा भरण्यासाठी मोबाईलची उपलब्धता, पोषण आहार आदी मुद्यांचा समावेश असेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सकारात्मक आणि दिलासादायक प्रतिसादामुळे आंदोलन मागे घेत असल्याचे अंगणवाडी सेविका संघाचे अध्यक्ष एम. एम. पाटील यांनी जाहीर केले. यावेळी शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांबाबचे सविस्तर निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केले.
वीज कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या 22 संघटनांनी कठीत खासकीकरणा विरोधात बहात्तर तासांचे आंदोलन पुकारले होते परंतु देवेंद्र फडणवीस यांच्याशी स्टाईल मुळे सर्व संघटनांनी आंदोलन 24 तासांच्या आत मागे घेतले. वीज कंपन्यांचे खाजगीकरण करण्यात येणार नाही उलट वीज निर्मितीसाठी 50000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी वीज कर्मचारी संघटनांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना दिली वीज कर्मचाऱ्यांनी घेतलेली भूमिका ही सरकारची भूमिका आहे, असे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर सर्व संघटनांनी आंदोलन मागे घेतले. वीज कर्मचारी संघटनांनी हे आंदोलन 72 तासांसाठी पुकारले होते. परंतु फडणवीस यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर 24 तासांच्या आत हे आंदोलन मागेही घेतले गेले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App