विरोधक पाला पाचोळ्यासारखे उडून जातील; केजरीवाल – ठाकरे – पवार भेटीवर मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी

प्रतिनिधी

मुंबई : 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी देशातल्या सर्व विरोधकांचा एकजुटीचा प्रयत्न सुरू असताना विरोधक पालापाचोळ्यासारखे उडून जातील, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोला हाणला आहे.Eknath shinde criticized kejriwal – Thackeray – Pawar meeting as futile exercise

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, दिल्लीच्या मंत्री अतिशी खासदार राघव चढ्ढा यांनी महाराष्ट्रात येऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यांच्याशी राजकीय चर्चा केली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या एकजुटीला टोला हाणून घेतला आहे


2019 मध्ये विरोधकांच्या एकजुटीचा देशातल्या जनतेने अनुभव घेतला आहे. तेव्हा हेच सगळे विरोधक एकत्र आले होते तरी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी भारी ठरले होते. 2014 पेक्षा 2019 मध्ये भाजपचे जास्त खासदार निवडून आले. तसेच 2024 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी सर्व विरोधकांना भारी पडतील आणि भाजपचे रेकॉर्ड ब्रेक खासदार निवडून येतील. कारण पंतप्रधान मोदी हे जनतेचे काम करणारे नेते आहेत. त्यांनी संपूर्ण जगात भारताची मान उंचावली आहे. जगातल्या सर्व मोठ्या अर्थव्यवस्था कोलमडल्या असताना देशाची अर्थव्यवस्था त्यांनी अकराव्या नंबर वरून पाचव्या नंबर वर आणून ठेवली आहे म्हणून जनता त्यांनाच कौल देईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. त्याचवेळी सर्व विरोधक पालापाचोळ्यासारखे उडून जातील. एकच मोदी सर्वांवर भारी, अशी राजकीय फटकेबाजी मुख्यमंत्र्यांनी केली.

Eknath shinde criticized kejriwal – Thackeray – Pawar meeting as futile exercise

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात