पुण्यातील जमीन घोटाळ्याप्रकरणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी मंदाकिनी खडसे यांची चौकशी केली. Eknath Khadse’s wife Mandakini reached the ED office and started investigation into the land scam
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे मंगळवारी ( आज, 2 नोव्हेंबर ) अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात पोहोचल्या आहेत . पुण्यातील जमीन घोटाळ्याप्रकरणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी मंदाकिनी खडसे यांची चौकशी केली. मंदाकिनी यांचे वकील मोहन टेकवडे यांनी सांगितले की, पुण्यातील कथित जमीन घोटाळ्याच्या तपासात मंदाकिनी खडसे पूर्ण सहकार्य करत आहेत. याअंतर्गत त्या मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर झाल्या.
एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावाई गिरीश चौधरी यांनी २८ एप्रिल २०१६ रोजी भोसरी एमआयडीसी येथील सव्र्हे क्र. ५२/२ अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केली. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंद केली.
एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या व त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झालेले आहेत. या सर्व व्यवहारात सुमारे ६१ कोटी रुपयांच्या महसुलाचं नुकसान झाल्याचं सकृतदर्शनी दिसून येत आहे. हा मोठा गैरव्यवहार असल्याचा ‘ईडी’ला संशय आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App