ED IT Scanners : देशमुख – मलिक “आत”; आता पुढचे नंबर राऊत – परब – जाधव – मुश्रीफ; किरीट सोमय्या यांचा दावा


प्रतिनिधी

मुंबई : मुंबई हायकोर्टाने नवाब मलिक आणि अनिल देशमुखांचे जामीन अर्ज फेटाळले आहेत. तर, नवाब मलिकांचा टेरर फंडींग सारख्या अपराधांसाठी NIA द्वारे तपास होणे बाकी आहे. त्यामुळे नवाब मलिक आणि अनिल देशमुख आता अनेक महिने जेलच्या बाहेर येतील असे मला वाटत नाही असे ट्विट करत यापुढे अजून चार नेत्यांच्या चौकशीला गती आली असून आगे आगे देखो होता है क्या!!, असा इशारा किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडीला दिला आहे.ED IT Scanners: Deshmukh – Malik “Inside”; Now the next number is Raut – Parab – Jadhav – Mushrif; Kirit Somaiya claimsनवाब मलिक यांना दणका

मुंबई उच्च न्यायालयाने अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांना पुन्हा एकदा दणका दिला आहे. ईडी विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाकडून मलिकांना दिलासा देण्यात आलेली नसून उच्च न्यायालयाने ईडीच्या कारवाईविरोधात केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.

तर, अनिल देशमुख यांच्या विरोधात भक्कम पुरावे, साक्षीदारांच्या जबाबात तफावत आणि देशमुख यांनी मनी लॉंड्रिंग केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे, या कारणामुळे न्यायालयाने देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. या पार्श्वभूमीवर अजून काही दिवस तरी, नवाब मलिक आणि अनिल देशमुख जेलच्या बाहेर येतील असे मला वाटत नाही, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

तसेच आता संजय राऊत, अनिल परब, हसन मुश्रीफ, यशवंत जाधव या चार नेत्यांच्या चौकशीला गती प्राप्त झाली आहे, आगे आगे देखो होता है क्या असे ट्विट करत किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे.

ED IT Scanners: Deshmukh – Malik “Inside”; Now the next number is Raut – Parab – Jadhav – Mushrif; Kirit Somaiya claims

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था