भोसरी भूखंड घोटाळा ED चौकशी; एकनाथ खडसे यांची तब्येत बिघडल्याने पत्रकार परिषद रद्द

विशेष प्रतिनिधी

मुंबई : तुम्ही आमच्यामागे ED लावली तर आम्ही तुमची CD लावू, अशी धमकीवजा भाषा वापरणाऱ्या माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या जावयाला ED अटक केल्यानंतर खडसे आज पत्रकार परिषद घेणार होते. पण त्याआधी त्यांची तब्येत बिघडली. त्यामुळे पत्रकार परिषद रद्द करावी लागली.ED interrogates businessman Avinash Bhosale’s son Amit for five hours

एकनाथ खडसे यांची पत्रकार परिषद रद्द झाल्याचे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून करण्यात आले आहे. खडसे यांची प्रकृती बिघडल्याने नियोजित पत्रकार परिषद रद्द करण्यात येत असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.



ज्या भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसेंना देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधून राजीनामा द्यावा लागला होता, त्याच घोटाळ्याच्या प्रकरणात खडसेंच्या ED ने अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास आणि चौकशी पुढे गेल्यानंतर स्वतः खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी यांना देखील अटक होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडणार होते. पण तब्येत बिघडल्याने पत्रकार परिषदच रद्द करण्यात आली. आता खडसे हे ED च्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहातात का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

एकनाथ खडसे यांनी भाजपवर आगपाखड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हा त्यांनी तुम्ही आमच्यामागे ED लावली तर आम्ही तुमची CD लावू, अशी धमकीवजा भाषा वापरली होती.

पण त्या भाषेचा काही उपयोग झालाच नाही. सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) त्यांना मोठा धक्का दिला आहे. खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली.

पुण्यातील भोसरी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी गिरीश चौधरी यांना ईडीकडून सोमवारी सकाळी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. रात्री उशीरापर्यंत त्यांची चौकशी सुरु होत यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली

ED interrogates businessman Avinash Bhosale’s son Amit for five hours

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात