प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांची सक्तवसूली संचलनालय अर्थात ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे हे शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. आतापर्यंत पिता पुत्राची तीनदा चौकशी झाली आहे. शेतकऱ्यांच्या नावावर उचललेले कर्ज कर्जमाफीत माफ करणे, गिरणी खरेदी यासह विविध विषयांत ईडीने तीन वेळा चौकशी केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. हा संपूर्ण घोटाळा 500 कोटी रूपयांच्या घरात आहे.ED inquiry into the son of NCP MLA Babanrao Shinde
कधीही होऊ शकते अटक
शेतक-यांच्या घामाचा पैसा त्यांना परत मिळवून देणार, वेळ पडलीच तर हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात याविरोधात आवाज उठवणार असल्याचे माढ्याचे शिवसेना नेते संजय कोकाटे यांनी म्हटले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. असे म्हटले जात आहे.
– पवारांचा ईडीवर हल्लाबोल
देशात सध्या याला अटक कर, त्याला आत टाक, धमक्या दे असे सुरू आहे. अनिल देशमुख यांच्यावर आरोप 100 कोटी गोळा करा असे सांगितले. पहिली चार्जशीट 100 कोटी गोळा केला आरोप नंतर दुरुस्त केली, 4 कोटी 70 लाख. नंतर पुन्हा दुरुस्त 1 कोटी 7 लाख झाला. म्हणजे हे 100 % टक्के खोटे आहे. केंद्रीय तपास यंत्रणा कुणाच्या तरी सांगण्यावरून काम करत आहेत हे लोकांना समजते. लोकांमध्ये संताप आणि नाराजी आहे. ती योग्य वेळी दिसेल, असेही शरद पवार यांनी कोल्हापूरमधील पत्रकार परिषदेत सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App