आधी जेलचे जेवण खा, त्यानंतर विचार करू, न्यायालयाने अनिल देशमुख यांना घरच्या जेवणाची परवानगी नाकारली


तुम्ही आधी जेलचे जेवण खा. त्यानंतर विचार करू, असे म्हणत न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना घरच्या जेवणाची परवानगी नाकारली आहे. देशमुख यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे.Eat a prison meal first, then we will think, the court denied Anil Deshmukh permission to have a home-cooked meal


विशेष प्रतिनिधी

मुंबई : तुम्ही आधी जेलचे जेवण खा. त्यानंतर विचार करू, असे म्हणत न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना घरच्या जेवणाची परवानगी नाकारली आहे. देशमुख यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे.

यापूर्वी न्यायालयीन कोठडी सुनावण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाच्या विशेष सुट्टीकालीन एकलपीठाने रविवारी रद्द केला होता. देशमुख यांना १२ नोव्हेंबपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कोठडी सुनावली गेली होती. त्यानंतर त्यांची कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश ईडीने दिले होते. आता पुन्हा एकदा त्यांना १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे.



देशमुख यांना २ नोव्हेंबर रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली होती. अंमलबजावणी संचालनालयाने मुंबईतील त्यांच्या कार्यालयात १२ तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली. मुंबईचे माजी पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी केलेल्या लाचखोरीच्या आरोपांमुळे देशमुख यांनी या वर्षाच्या सुरुवातीला आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.म्ही आधी जेलचे जेवण खा. त्यानंतर विचार करू, असे म्हणत न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना घरच्या जेवणाची परवानगी नाकारली आहे. देशमुख यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे.

Eat a prison meal first, then we will think, the court denied Anil Deshmukh permission to have a home-cooked meal

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात