ठाकरे सरकारमुळे शेतकरी कंगाल, विमा कंपन्या मालामाल, माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांचा आरोप

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची लूट करुन विमा कंपन्या मालामाल केल्या आहेत, असा आरोप माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी हा आरोप केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं निकष बदलल्यामुळं शेतकऱ्याना कमी प्रमाणात नुकसानभरपाई मिळाली. त्यामुळे विमा कंपन्यांना 4234 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाल्याचे त्यांनी सांगितले.Due to Thakre goverment farmers in problem and insurance companys prospered


प्रतिनिधी

अमरावती: महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची लूट करुन विमा कंपन्या मालामाल केल्या आहेत, असा आरोप माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी हा आरोप केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं निकष बदलल्यामुळं शेतकऱ्यांना कमी प्रमाणात नुकसानभरपाई मिळाली. त्यामुळे विमा कंपन्यांना 4234 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाल्याचे त्यांनी सांगितले.

बोंडे म्हणाले, खरिप 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने पीक विमा कंपन्या सोबत केलेल्या करारानुसार 85 लाख शेतकऱ्यांना 5795 कोटी रुपयाचा लाभ मिळाला होता. परंतु 2020 च्या खरिप हंगामाकरिता उद्धव ठाकरे सरकारनं विम्याचे निकष बदलले. उंबरठा उत्पादन कमी केले आणि त्यामुळे महाराष्ट्रात खरिप 2020 मध्ये फक्त 743 कोटी रुपये पीक विमा नुकसानभरपाई वाटप आज पर्यंत शेतकºयांना करण्यात आली.



पंतप्रधान पिक विमा शेतकऱ्यांच्या भल्याकरिता असला तरी महाराष्ट्रामध्ये विमा कंपन्या मालामाल करण्याचा उद्योग उद्धव ठाकरे सरकारनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या शासन काळामध्ये खरीप २०१९ मध्ये महाराष्ट्रात १२८ लाख शेतकऱ्यांनी पिक विमा काढला होता.

त्याकरिता शेतकरी हिस्सा, ६७८ कोटी रुपयाचा होता तर राज्य व केंद्र सरकारच्या हिस्यासह संपूर्ण विमा हप्ता पोटी ४७८८ कोटी रुपये भरण्यात आले होते. २०१९ खरीपाम्ध्ये ८५ लाख शेतकऱ्यांना ५७९५ कोटी रुपयाचा पिक विमा प्राप्त झाला होता व त्याचे वाटप झाले होते.

खरीप २०२० करिता उद्धव ठाकरे सरकारनी निकषामध्ये बदल करून कमी उंबरठा उत्पादन तीन वर्षाकरिता गोठविले. २०२० खरिपामध्ये १०७ लाख शेतकऱ्यांनी खरीप पिक विमा काढला. याकरिता शेतकऱ्यांनी ५३० कोटी राज्य सरकारनी २४३८ कोटी, केंद्र सरकारनी २२४९ कोटी असा ५२१७ कोटी रुपयांचा विमा हप्ता विमा कंपन्यांना दिला. खरीप २०२० मध्ये अवकाळी पाउस, चक्रीवादळ अशी अनेक संकट आलीत. कापुसाचे उत्पादन बोंडअळीमुळे कमी झाले.

सोयाबीन हाती आल नाही. बियाण्यांचे प्लॉट सुद्धा खराब झाले. सर्व पिकांची विदारक परिस्थिती असतांना सुद्धा विमा कंपन्यांनी कृषी विभागा सोबत हात मिळवणी करून फक्त १५ लाख शेतकऱ्यांना ९७४ कोटी रुपयांची नुकसानभरपाई निश्चित केली व त्यातील ७४३ कोटी रुपयांचे वाटप फक्त ११ लाख शेतकऱ्यांना करण्यात आले. विमा कंपन्यांना उद्धव ठाकरे सरकारच्या आशिवार्दाने ४२३४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा खरीप २०२० मध्ये मिळाला.

Due to Thakre goverment farmers in problem and insurance companys prospered

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात