डॉ.आंबेडकर जन्मभूमी स्मारक वाचविण्यासाठी मशाल यात्रा

विशेष प्रतिनिधी

पुणे : महू (मध्य प्रदेश) येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जन्मभूमी स्मारकाचे व्यवस्थापन करणाऱ्या डॉ.आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या ठिकाणी मध्य प्रदेश सरकारने नवी स्मारक समिती स्थापन करुन स्मारकाचे व्यवस्थापन सोपवली. संघ परिवाराचा कब्जा केला जात असल्याचा संशय आहे. स्मारक वाचविण्यासाठी पुणे ते महू भीमज्योत मशाल यात्रा १९ फेब्रुवारी रोजी डॉ.आंबेडकरांच्या जयघोषात महू येथे पोहोचली. Dr. Torch procession to save Ambedkar Janmabhoomi memorial

संयुक्त संविधान बचावो कृती समिती,भीम जन्मभूमी बचावो कृती समिती,इनक्रेडिबल समाजसेवक गृपच्या वतीने या यात्रेचे आयोजन करण्यात आले. अस्लम इसाक बागवान​ यांनी यात्रेचे नेतृत्व केले. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता डॉ आंबेडकर पुतळा (रेल्वे स्टेशन,पुणे) येथून यात्रेला प्रारंभ करण्यात आला.औरंगाबाद,जळगाव,भुसावळ,नेपानगर,बुऱ्हाणपूर, खांडवा, महेश्वर, मंडलेश्वर मार्गे महूला ही यात्रा १९ फेब्रुवारी रोजी पोहचली. 20 फेब्रुवारी पासून अहिंसक मार्गाने बेमुदत सत्याग्रहास सुरूवात करण्यात आली.मागणी मान्य होईपर्यन्त सत्याग्रह सुरु राहिल, असे बागवान, डॉ.आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे माजी सचिव मोहन वाकोडे यांनी सांगितले.

यावेळी सचिन अल्हाट ,निखिल गायकवाड ,मोहन मार्शल, सुनील सारीपुत्र ,एम डी चौबे ,एडविन भारतीय,अरुण चौहान,अजय वर्मा,सोबर सिंह, जितेंद्र सेंगर, प्रवीण निखाडे, संजय सोळंकी, विनोद यादव, मुकुल वाघ, अमित भालसे, राजेश पगारे, निर्मल कामदार, प्यारेलाल वर्मा उपस्थित होते.

Dr. Torch procession to save Ambedkar Janmabhoomi memorial

महत्त्वाच्या बातम्या