ईडी कारवाईच्या भीतीने आमच्याकडे येऊ नका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे जाहीर आवाहन

प्रतिनिधी

संभाजीनगर : ईडी कारवाईच्या भीतीने कोणीही आमच्या शिवसेनेत येऊ नये. त्याचा काही उपयोग होणार नाही, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीनगर दौऱ्यात दिला आहे. Don’t come to us for fear of ED action eknath shinde

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. पत्राचाळ प्रकरणात सध्या संजय राऊत यांची चौकशी सुरू असून याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्रकार परिषदेत विचारले असता ते म्हणाले, ईडीची चौकशी सुरू आहे, तसेही संजय राऊत म्हणतात मी काही केलेले नाही. चौकशीला सामोरे जाणार, मग कर नाही त्याला डर कशाला?, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.

संजय राऊत यांना कोणीही भाजपकडे बोलावलेले नाही, निमंत्रणही दिलेले नाही. ईडी कारवाईच्या भीतीने आमच्याकडे येऊ नका, दबाव टाकून कोणालाही पक्षात घ्यायचं नाही, हे मी जाहीर आवाहन करतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

– सरकार कालावधी पूर्ण करून पुढच्या निवडणुका सुद्धा जिंकेल

केंद्रीय तपास यंत्रणांनी सूडाने काम केले असते तर न्यायलयाने संबंधितांना लगेच दिलासा दिला असता. परंतु, यापूर्वीची प्रकरणे तुम्ही तपासा एकही सूडाची कारवाई केलेली नाही. आमचं सरकार कालावधी पूर्ण करून पुढच्या निवडणुका सुद्धा जिंकेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केला.

Don’t come to us for fear of ED action eknath shinde

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात