कुत्र्याच्या पिल्लाने घाण केल्याने रहिवाशांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी ;महिलांना पुरुषांनी देखील केली मारहाण

विशेष प्रतिनिधी

मुंबई : डोंबिवली पूर्वेकडील देसले पाडा परिसरातील साई इन्कलेव्ह  सोसायटीमध्ये१४ जुलै रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दोन शेजाऱ्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादाचे पर्यावसन तुफान हाणामारीत झाले. त्यात पुरूषां बरोबर महिला आघाडीवर होत्या. on Dog puppies Latrine issu Freestyle fighting among residents in Dombivli

इमारतीत राहणाऱ्या एका महिलेच्या कुत्र्याने एका मजल्यावर घाण केली. दुसऱ्या महिलेने या मुद्द्यावर त्या महिलेशी वाद घातला. हा वाद विकोपाला गेला . काही क्षणातच या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. ही फ्री स्टाईल हाणामारी मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली. या व्हिडिओ मध्ये काही महिला एकमेकींना बेदम मारहाण करत आहेत तर पुरुषांमध्ये देखील हाणामारी होताना दिसत आहे .सोसायटीमधील या फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे . याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करत दोन्ही बाजूकडील एकूण १४ ते १५ जणांविरोधात गुन्हा देखील दाखल झाला असून चार जणांना अटक केली आहे. पुढील तपास सुरू  असल्याची माहिती मानपाडा पोलिसांनी दिली

  •  कुत्र्याच्या पिल्लाने घाण केल्याने वाद विकोपाला
  • डोंबवलीत रहिवाशांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी
  • देसले पाडातील साई इन्कलेव्ह सोसायटीमध्ये राडा
  • महिलांकडून एकमेकींना बेदम मारहाण
  •  फ्री स्टाईल हाणामारी मोबाईल कॅमेऱ्यात कैद
  • पुरुषांमध्ये देखील एकमेकांना बदडले
  • हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

on Dog puppies Latrine issu Freestyle fighting among residents in Dombivli