कुत्र्याची पिल्ले आणि योगींची मौत; आपच्या आमदाराचा सुटला तोल


वृत्तसंस्था

रायबरेली : आम आदमी पार्टी बनून उणीपुरी १० वर्षेही झाली नाहीत, तोच या पार्टीतले नेते इतर राजकीय पक्षांमधल्या काही गयेगुजऱ्या नेत्यांप्रमाणेच वागायला लागल्याचे प्रत्यंतर यायला लागलेय. दिल्लीतील आपचे आमदार सोमनाथ भारती एकतर आधी यूपीत मुले नाही, तर कुत्र्यांची पिल्ले जन्माला येताहेत का, असे असभ्यपणे विचारणा करते झाले… AAP MLA somnath bharati arrested in UP for derogatary remarks against UP infants

भाजपच्या कार्यकर्त्यांनीही त्यांच्या वरताण करत अंगावर शाई फेकली… त्यावर सोमनाथ भारती संतापून म्हणाले, योगी की मौत सुनिश्चित है… आधीचे वादग्रस्त वक्तव्य… नंतरची शाईफेक आणि त्यानंतरचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य याने उत्तर प्रदेशात आप विरूध्द भाजप असा असभ्य सामना रंगताना दिसतोय. सोमनाथ भारतींना पोलिसांनी अटकही केली आहे.


राहुलजींच्या “हातावर केजरीवालांचा हात”; कृषी कायद्याचे नोटिफाइड कागद दिल्ली विधानसभेत फाडले


उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असणाऱ्या सोमनाथ भारती यांनी अमेठीमध्ये शनिवारी कार्यकर्त्यांसमोर भाषण केले. यावेळी राज्यातील योगी सरकारच्या कारभारावर टीका करताना भारती यांनी ताळतंत्र सोडले. त्यांनी उत्तर प्रदेशमधील रुग्णालयांमध्ये जन्म घेणाऱ्या बालकांची तुलना कुत्र्याच्या पिल्लांशी केली. “आम्ही उत्तर प्रदेशमध्ये आलो आहोत. येथील शाळा आम्ही पाहिल्या. रुग्णालये आम्ही पाहिली. परिस्थिती इतकी भयंकर आहे की इथल्या रुग्णालयांमध्ये मुले तर जन्म घेत आहेत की मात्र कुत्र्याची पिल्ले जन्म घेत आहेत, असे वाटते. अस्पतालों में बच्चे तो पैदा हो रहे हैं, लेकिन कुत्तों के बच्चे पैदा हो रहे हैं,” अशा असभ्य शब्दांमध्ये भारती यांनी टीका केली होती.

त्यानंतर रायबरेलीच्या गेस्ट हाऊसमध्ये ते थांबले होते. तेथे सकाळी भाजपचे कार्यकर्ते घुसले आणि सोमनाथ भारती यांच्यावर शाई फेकली. त्यावर चिडून सोमनाथ भारती यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले, ते म्हणाले, अब योगी की मौत सुनिश्चित है… हा विडिओ चांगलाच व्हायरल झाला.

याच विडीओवरून भाजपाचे दिल्लीमधील प्रवक्ते खेमचंद शर्मा यांनी आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जाहीर आव्हान दिले आहे. केजरीवाल यांनी त्यांच्या आमदाराच्या वक्तव्याचे समर्थन करावे आणि त्याचे परिणाम भोगण्यास तयार रहावे किंवा तातडीने भारती यांना निलंबित करावे.

AAP MLA somnath bharati arrested in UP for derogatary remarks against UP infants

भारती हे एखाद्या आमदाराप्रमाणे वागत नाहीत तर एखाद्या डॉनप्रमाणे वागत आहेत, अशी टीकाही शर्मा यांनी केली आहे.  भारती यांच्यावर झालेला शाई हल्ला हा त्यांच्याच पापामुळे झाला आहे, असेही शर्मांनी समर्थन करून वादात भरही घातली आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था