विशेष प्रतिनिधी
मुंबई : नवीन वर्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा आनंद घेऊन येणार आहे. जानेवारी २०२२ मध्ये पुन्हा त्यांचा महागाई भत्ता वाढणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार पुन्हा वाढणार आहेत. Diwali of central employees in the new year; Inflation Allowance (DA )will rise again in January
महागाई भत्ता किती वाढवला जाईल याचा निर्णय झालेला नाही. परंतु, तो ३ % वाढण्याची अपेक्षा आहे. तज्ज्ञांच्या मते, जानेवारी २०२२ मध्येही महागाई भत्ता ३ % ने वाढवला जाऊ शकतो. म्हणजेच, जर 3% वाढ झाली तर एकूण DA ३१ % वरून ३४ % पर्यंत वाढू शकतो. AICPI डेटानुसार, सप्टेंबर २०२१ पर्यंतची आकडेवारी आता समोर आली आहे.
AICPI डेटानुसार, सप्टेंबर २०२१ पर्यंतची आकडेवारी आता बाहेर आली आहे. त्यानुसार, महागाई भत्ता (DA) ३२.८१ टक्के आहे. जून २०२१ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, जुलै २०२१ च्या महागाई भत्त्यात ३१ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच, आता त्याच्या पुढील आकडेवारीनुसार, महागाई भत्ता मोजला जाईल आणि त्यात चांगली वाढ दिसून येईल.
महागाई भत्ता ३ % ने वाढवल्यानंतर एकूण DA ३४ % होईल. आता १८,००० रुपयांच्या मूळ पगारावर एकूण वार्षिक महागाई भत्ता ७३,४४० रुपये असेल. पण फरकाबद्दल बोलायचे झाले तर पगारात वार्षिक ६४८० रुपये वाढ होणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App