विशेष प्रतिनिधी
मुंबई : आपल्या कला कौशल्याने अनेक सिनेमांमध्ये नेपथ्य जिवंत करणारे सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जत मधील आपल्याच स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्या मागे काही आर्थिक कारण असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. director nitin desai passed away
नितीन देसाई कला दिग्दर्शक असण्या बरोबरच उत्तम अभिनेते देखील होते. बालगंधर्वांच्या जीवनावर आधारित बायोपिक बालगंधर्व ही त्यांची आयकॉनिक निर्मिती होती. या सिनेमात त्यांनी लोकमान्य टिळकांची भूमिका केली होती.
त्याचबरोबर नितीन देसाई यांनी बॉलीवूड मधल्या अनेक गाजलेल्या चित्रपटांचे कला दिग्दर्शन केले होते. यामध्ये जोधा अकबर, देवदास, लगान, माचिस, 1942 लव स्टोरी आदी चित्रपटांचा समावेश होता. मुंबईतील अनेक सुप्रसिद्ध गणेश मंडळांचे देखावे उभारण्यातही नितीन देसाईंचा हातखंड होता. यात लालबागचा राजा मुंबईचा राजा आदी गणेश मंडळांचा समावेश होता. नितीन देसाईंच्या आत्महत्येमागे काही आर्थिक कारण असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App