प्रतिनिधी
मुंबई : सध्याच्या गणेशोत्सवात सर्वपक्षीय विशेषतः हिंदुत्ववादी पक्षांचे नेते एकमेकांच्या घरी जाऊन गणेश दर्शने घेत आहेत. या निमित्ताने त्यांच्या (न)राजकीय चर्चा होत आहेत. इतकेच नाही तर सध्या काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता असून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली 10 आमदार फुटून भाजप अथवा शिंदे गटात येऊन मिळण्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गणेश दर्शन दौऱ्यावर निघाल्यासारखे रोज विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन आपापले राजकारण मजबूत करत आहेत.”Different” visit among high profile visits of Ganeshotsav!!; Ajit Doval meets Governor!!; What will happen in Maharashtra??
खासगी निवासस्थानात भेट
त्याच वेळी मुंबईत आज एक अत्यंत हाय प्रोफाईल पण खाजगी भेट घडली आहे. केंद्र सरकारचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची खासगी भेट घेतली आहे. ही भेट राजभवनातील राज्यपालांच्या कार्यालयात झालेली नसून त्यांच्या खासगी निवासस्थानी झालेली दिसते आहे. या भेटीचे फोटो एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले आहेत. त्यामध्ये राज्यपालांच्या खाजगी निवासस्थानातलाच सगळा तामझाम दिसतो आहे. राज्यपाल देखील आपल्या नेहमीच्या पोशाखात नसून त्यांनी उत्तराखंडी टोपी परिधान केलेली नाही. अजित डोवाल देखील त्यांच्या राजशिष्टाचाराच्या थ्री पीस सूट मध्ये नसून साधा निळा शर्ट पॅन्ट आणि खासगी निवासस्थानात असल्यामुळे त्यांनी पादत्राणे देखील बाहेर काढून ठेवलेली दिसत आहेत. राज्यपालांच्या शासकीय निवासस्थानी एका कोपऱ्यातील मेजावर गणेशाची मूर्ती आणि त्याखाली स्वामी विवेकानंदांची मूर्ती आहे.
महाराष्ट्र: NSA अजीत डोभाल ने आज मुंबई के राजभवन में महाराष्ट्र के राज्यपाल भगत सिंह कोश्यारी से मुलाकात की। pic.twitter.com/uPNSSuNBr3 — ANI_HindiNews (@AHindinews) September 3, 2022
महाराष्ट्र: NSA अजीत डोभाल ने आज मुंबई के राजभवन में महाराष्ट्र के राज्यपाल भगत सिंह कोश्यारी से मुलाकात की। pic.twitter.com/uPNSSuNBr3
— ANI_HindiNews (@AHindinews) September 3, 2022
भेटीनंतर काय घडणार
अजित डोवाल – राज्यपाल भेटीची ही सगळी पार्श्वभूमी सध्याच्या गणेशोत्सवाची असली तरी अजित डोवाल यांच्यासारखे देशाच्या राजकारणामध्ये आणि प्रशासनामध्ये सर्वाधिक महत्त्वाची भूमिका बजावणारे अधिकारी जेव्हा राज्यपालांना भेटतात त्यातही खासगी निवासस्थाने भेटतात याला एक वेगळे महत्त्व आहे. त्यांच्या या भेटीमागे नेमके राजकारण काय घडले आहे?? भविष्यात महाराष्ट्रात नेमके काय होऊ शकते?? या विषयी इथून पुढे अटकळी बांधायला वेग येईल. पण अजित डोवाल यांची कुठलीही भेट ही “सहज” अथवा सर्वसामान्य असते का?? त्यांच्या भेटीनंतर काहीच दिवसात काय काय आणि कुठे कुठे घडते??, हे देशाने जम्मू-काश्मीरमध्ये आणि पाकिस्तानच्या पाकिस्तान मधील सर्जिकल आणि एअर स्ट्राईकच्या वेळी अनुभवले आहे. आता राज्यपालांची त्यांनी भेट घेतल्यानंतर महाराष्ट्रात नेमके काय घडणार आहे??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे!!
Differen visit among high profile visits of Ganeshotsav Ajit Doval meets Governor What will happen in Maharashtra
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App