गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदींनी शेअर केला पार्ल्याच्या लोकमान्य सेवा संघाचा गणपती!!


प्रतिनिधी

नवी दिल्ली : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देताना अनेक नेते आपापल्या गणपतींचे फोटो आपापल्या वैयक्तिक सोशल मीडिया हँडल वरून शेअर करत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गणेश चतुर्थीच्या तमाम भारतीय आणि हिंदूंना शुभेच्छा देताना लोकमान्य टिळकांची आठवण जागी केली आहे. Prime Minister Modi shared Ganesha of Lokmanya Seva Sangh of Parlya while wishing Ganeshotsav

पंतप्रधानांनी दोन वर्षांपूर्वी सार्वजनिक गणेशोत्सवात आपल्या मुंबई दौऱ्यात पार्ल्याच्या लोकमान्य सेवा संघाला भेट देऊन तिथल्या गणपतीची पूजा केली होती. मोदींनी हा फोटो आज गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देताना आपल्या फेसबुक अकाउंट वरून शेअर केला आहे. लोकमान्य सेवा संघाच्या गणपतीचे पूजन झाल्यानंतर पंतप्रधानांनी तिथल्या सर्व उपक्रमांची माहिती स्थानिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून घेतली होती. त्याच्याही आठवणी पंतप्रधानांनी जाग्या केल्या आहेत.

– शिंदे, फडणवीसांकडून गणेश प्रतिष्ठापना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आज आपले शासकीय निवासस्थान वर्षावर श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली. महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला त्यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले शासकीय निवासस्थान सागर या बंगल्यावर गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे.

Prime Minister Modi shared Ganesha of Lokmanya Seva Sangh of Parlya while wishing Ganeshotsav

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!