धुळे : 35 वर्षांनंतर साक्री नगरपंचायतीत शिवसेनेचा दारुण पराभव, पहिल्यांदाच भाजपची एकहाती सत्ता


साक्री नगरपंचायतीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहे या निकालांमध्ये 35 वर्षांपासून नाना नागरे यांची एक हाती सत्ता होती, मात्र साक्री नगर पंचायतीमध्ये यंदा भाजपने जोरदार मुसंडी मारत शिवसेनेचे नेते नाना नागरे यांचा जोरदार पराभव केला आहे. Dhule Shiv Sena’s drastic defeat in Sakri Nagar Panchayat after 35 years, BJP’s one-sided rule for the first time


प्रतिनिधी

धुळे : साक्री नगरपंचायतीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहे या निकालांमध्ये 35 वर्षांपासून नाना नागरे यांची एक हाती सत्ता होती, मात्र साक्री नगर पंचायतीमध्ये यंदा भाजपने जोरदार मुसंडी मारत शिवसेनेचे नेते नाना नागरे यांचा जोरदार पराभव केला आहे.

साक्री नगरपंचायतीच्या जाहीर झालेला निकालात भाजपला एक हाती सत्ता मिळाली असून, या निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेनेचा दारुण पराभव झाला आहे. विशेष म्हणजे गेल्या 40 वर्षांपासून दबदबा असलेल्या नाना नागरे यांनादेखील या निवडणुकीत अपयशाला सामोरे जावे लागले असून शिवसेनेला फक्त चार जागांवर यश मिळाले आहे.



संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या साक्री नगरपंचायतीवर भाजपाने 11 जागांवर विजय मिळवत झेंडा फडकल्याने भाजप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. या निवडणुकीत भाजपला 11, शिवसेनेला 4, काँग्रेसला 1 अशा जागा मिळाल्या असून एका जागेवर अपक्ष विजयी झाला आहे.

Dhule Shiv Sena’s drastic defeat in Sakri Nagar Panchayat after 35 years, BJP’s one-sided rule for the first time

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”