आमने-सामने : पश्चिम बंगालमधील ममतांच्या विजयानंतर संजय राऊत यांचा आनंद गगनात मावेना; फडणवीसांचा टोला बेगानी शादी में अब्दुला दिवाना!


विशेष प्रतिनिधी

मुंबई: पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निकालावरून संजय राऊत यांनी खोचक ट्विट करत पंतप्रधान आणि इतर भाजप नेत्यांवर निशाणा साधला होता .यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना प्रत्युतर देताना महाराष्ट्रातील पंढरपुर पोटनिवडणूकीची आठवण करून दिली. पाच राज्यांचा निकाल लागला आहे. यांचा या विजयाशी संबंध काय? संजय राऊत आणि आघाडीचे नेते म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना आहेत, असा बोचरा वार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. devendra fadnavis slams sanjay raut over five states election results

बंगालमध्ये आम्हाला सत्ता मिळाली नाही. परंतु, बंगालमध्ये भगव्याचा बोलबाला आता सुरू झाला आहे. बंगालमध्ये शिवसेनेचा संबंध नाही. राष्ट्रवादी आज हरलेली आहे. काँग्रेसलाही मोठा फटका बसला आहे. ममतादीदींच्या यशामुळे यांना आनंद झाला आहे. मला संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेलं वक्तव्य ऐकून एका गोष्टीच आश्चर्य वाटत. बेगानी शादी मे अब्दुला दिवाना हे मी आज पाहिलं. दुसऱ्याच्या घरी मुलगा झाला म्हणून पेढे वाटण्याचं काम करताना हे नेते दिसले, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.



दीड वर्षाच्या महाविकास आघाडीच्या गैरकारभाराच्या भोंगळ कारभाराला आरसा दाखविण्याचे काम पंढरपुरच्या मतदारांनी केलं आहे. सरकारी यंत्रणेचा गैरवापर आणि तिन्ही पक्षांचे नेते असताना समाधान अवताडे निवडून आले. त्यांचे मी अभिनंदन करतो. सरकारविरोधात किती रोष आहे, हे यातून स्पष्ट होतं, असंही ते म्हणाले.

मी करेक्ट कार्यक्रम करतो असं बोललो होतो. आजही मी त्या वक्तव्यावर ठाम आहे. योग्यवेळ आल्यावर ते करणारच आहोत. पण आज योग्य वेळ नाही. आम्ही आमचे श्रम कोरोनासाठी वळविले आहे. सध्या कोरोनाचे संकट आहे. त्याकडे लक्ष दिलं पाहिजे, असं फडणवीस म्हणाले.

काय म्हणाले होते संजय राऊत?

भाजपाने सर्वांना काम लावलं होतं, पण तरीही ममतादीदी भारी पडल्या“एका स्त्रीने जिला आम्ही बंगालची वाघीण म्हणतो. ती निवडणुकीच्या काळात जखमी झाली. व्हिलचेअर फिरत होती. मात्र तिने बंगालमध्ये एकहाती विजय प्राप्त केला. हा विजय देशाच्या राजकारणाला दिशा देणारा आहे. बंगालच्या विजयाची मशाल देशभर प्रकाश पाडेल,” असे संजय राऊत म्हणाले.इतकच नाही तर राऊत यांनी ट्विटरवरुनही ममतांसोबतचा फोटो शेअर करत अप्रत्यक्षपणे मोदींना डिवचलं आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात कोणताही बदल होणार नाही. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा खूप मोठा विजय होईल आणि महाराष्ट्रात भूकंप येईल अशी अफवा पसरवली जात होती. पण असं झालेलं नाही. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र भावनेने एकमेकांशी जोडलेला आहे. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र नेहमी राष्ट्रहितासाठी लढले आहेत. यापुढेही आम्ही सोबत असू.

devendra fadnavis slams sanjay raut over five states election results

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात