विशेष प्रतिनिधी
मुंबई – कोरोनासंबंधी संभाव्य लॉकडाऊनवरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे – पवार सरकारला गंभीर सूचना केल्या आहेत. जनतेचा उद्रेक होईल, हे लक्षात घेऊन निर्णय घ्या. जनतेला आर्थिक मदत करण्याचाही विचार करा, असा सल्लाही फडणवीस यांनी सरकारला दिला. devendra fadanavis suggests financial help be given to people during lockdown
सर्वपक्षीय बैठकीत देवेंद्र फडणवीस म्हणाले, की कोरोनाची चाचणी केल्यावर रिपोर्ट तात्काळ येतील मिळतील याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. रेमडिसिवीर संदर्भात खासगी हाँस्पिटलमध्ये उपलब्ध नाहीये. फक्त सरकारी हाँस्पिटलमध्ये उपलब्धता नको खासगी हाँस्पिटलमध्येही हवेत. रेमडिसिवीर तात्काळ कसे उपलब्ध कसे देता येईल.”
जनतेमधील उद्रेक लक्षात घेऊन निर्णय घ्यावा लागेल. काही जण तर आम्ही मेलो तरी चालेल पण आम्हाला धंदा करू द्यात असे म्हणणारे लोक आहेत, त्यासाठी आपण अशा लोकांचाही विचार करावा. ज्यांना सर्व कर भरावे लागतात आणि कर्जही फेडावें लागत आहे अशा परिस्थितीत कस घर चालवायचे, असा प्रश्न आहे. याकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी सूचनाही फडणवीस यांनी केली.
काय काय चालवता येईल याचा विचार करून निर्णय घ्यावा. ज्यांचे काम सुरू करता येणार नाही त्यांच्यासाठीही काय करता येईल हे देखील पहावे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
फडणवीस म्हणाले…
हे ही वाचा
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App