कनिष्ठ वेतनश्रेणीकर्मचारी संघटनेने संप मागे घेऊनही एसटी कर्मचारी मात्र संपावर ठाम


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कनिष्ठ वेतन श्रेणी संघटनेने संप मागे घेतल्याची घोषणा संघटनेचे नेते अजयकुमार गुजर यांनी केली आहे. मात्र; एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. अजय कुमार गुजर यांचा निर्णय अमान्य असून, आम्ही कामावर रुजू होणार नसल्याचे कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.Despite the withdrawal of the strike by the junior wage workers’ union, the ST workers insisted on the strike

एसटी कर्मचाºयांना कामावर रुजू होण्यासाठी अल्टिमेटम देऊनही काही ठिकाणी एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. गेल्या 54 दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. एकदा परिवहनमंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्याचे आवाहन केले आहे. रुजू झालेल्या दिवशी बडतर्फी आणि निलंबन मागे घेणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर म्हणाले, आम्ही संप पुकारला होता. तो आज झालेल्या बैठकीनंतर आम्ही मागे घेत आहोत. एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाचा लढा न्यायालयावर सोपवलेला आहे. न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य असेल.

राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की, सर्व कर्मचाºयांना आपण पुकारलेला लढा चर्चा केल्याप्रमाणे आता थांबवत आहोत. 22 डिसेंबरपर्यंत तुम्ही कामावर हजर व्हा. आपल्यावरील कारवाई मागे घेण्याची विनंती आम्ही केली आहे.

एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ट श्रेणी संघटनेची आज मंत्रालयात बैठक घेण्यात आली. त्यानंतर अनिल परब बोलत होते. बैठकीला परिवहन मंत्री अनिल परब, व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, महा व्यवस्थापक माधव काळे, संघटनेचे अजय गुजर उपस्थित आहे.

निल परब म्हणाले, एसटी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर समितीचा निर्णय संपकरी आणि राज्य सरकारला मान्य आहे. विलीनीकरणाच्या मुद्द्यावर न्यायालयाच्या समितीचा निर्णय संपकरी आणि राज्य सरकार या दोन्ही बाजूंना मान्य आहे. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये वेतन मिळण्याबाबतच्या मागणीवरही राज्य सरकार संघटनेशी चर्चा करणार आहे.

ज्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली, ते कर्मचारी जर कामावर पुन्हा रूजू झाले तर त्यांच्यावरची कारवाई मागे घेतली जाईल. तसेच त्यांच्यावरील फौजदारी गुन्हे ज्यांच्यावर दाखल झाले आहेत त्यांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कारवाई मागे घेण्यात येणार आहे.

आत्महत्याग्रस्त कर्मचाऱ्यांची सर्व प्रकरणे तपासून त्याचा अहवाल तयार करुन त्यांच्या वारसांना नोकरी देण्याबाबत विचार केला जाणार आहे. 22 डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांनी कामावर दाखल होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ज्या कर्मचाºयांना कामावर बाहेरगावी असल्याने उशीर होईल त्यांना एक दिवसाची सवलत देण्यात येईल. कर्मचाऱ्यांना कामावर यावे चचेर्तून प्रश्न सुटू शकतात, असे देखील अनिल परब या वेळी म्हणाले.

Despite the withdrawal of the strike by the junior wage workers’ union, the ST workers insisted on the strike

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण