”सावरकरांनी ११ वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा भोगली आणि हे हरामखोर…” देवेंद्र फडणवीसांचे काँग्रेसवर टीकास्त्र!

‘’तुम्ही ज्या पक्षाचं नाव सांगतात त्या पक्षाच्या नेत्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरव केला आहे.’’ असंही फडणवीस म्हणाले आहेत.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आणि स्वातंत्र्यीवर सावरकरांच्या सन्मानार्थ राज्यभरात सावरकर गौरव यात्रा सुरू केली आहे. आज मुंबईतील सावरकर गौरव यात्रेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना, राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार घणाघात केला. Deputy Chief Minister Devendra Fadnavis criticizes Congress for insulting freedom hero Savarkar during Savarkar Gaurav Yatra


”सावरकर होण्याची औकात काँग्रेसमध्ये कुणातच नाही; तुम्ही सावरकरही होऊ शकत नाही आणि गांधीही होऊ शकत नाही”


देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘’सावरकरांनी ११ वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा भोगली आणि हे हरामखोर लोक जे सांगतात की त्यांनी शिक्षा भोगत असताना माफी मागितली. अरे हरामखोरांनो बघा त्यांनी काय लिहिलं आहे. त्या ठिकाणी कोर्टात केलेला अर्ज आहे आणि त्या अर्जा सावरकर शेवटी म्हणतात, मला माहिती आहे तुम्ही मला सोडणार नाहीत. मला नाही सोडलं तरी चालेल, पण जे बाकीचे आहेत त्यांच्यावतीने मी तुम्हाला विनंती करतो, इतर सगळ्यांना सोडून द्या. त्यामुळे सावरकरांना हे त्याही क्षणी माहिती होतं. सावरकरांनी अर्ज केला तो स्वत:साठी नाही, केलेला अर्ज हा इतर सगळ्या कैद्यांच्यावतीने केलेला अर्ज होता. सर्व राजकीय कैद्यांना सोडण्यात आलं परंतु सावरकरांना सोडलं नव्हतं. कारण, इंग्रजांना माहीत होतं की सावरकर बाहेर आले तर आपलं राज्य उलथवल्याशिवाय राहणार नाहीत.’’

निर्लज्ज लोकांवर टीका करायलादेखील मला लाज वाटते, कारण त्यांची तेवढीही पात्रता नाही –

याचबरोबर,‘’महात्मा गांधींनी सावरकरांच्या बंधूंना पत्र पाठवून सांगितलं, की सावरकरांना अर्ज करायला लावा. की सगळे राजकीय बंदी सोडले मी पण राजकीय बंदी आहे, मलाही सोडा. एवढंच नाही तर महात्मा गांधींनी लेख लिहिल आणि सांगतिलं की सावरकरांनी अर्ज केला पाहिजे आणि इंग्रज सरकारने त्यांना सोडलं पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकारांबद्दल नेहमीच काँग्रेसला भीती राहिली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना सुद्धा काँग्रेसने कधीच त्यांची जागा मिळू दिली नाही. दु:ख आहे, जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले ते स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणतात. अरे थू तुमच्यावर, शरम करा तुम्ही. अशा निर्लज्ज लोकांवर टीका करायलादेखील मला लाज वाटते, कारण त्यांची तेवढीही पात्रता नाही. जे स्वातंत्र्यवीर सावरकरांना समजू शकत नाहीत, त्यांची तेवढीही पात्रता नाही. अरे तुम्ही ज्या पक्षाचं नाव सांगतात त्या पक्षाच्या नेत्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरव केला. इंदिरा गांधी, यशंतवराव चव्हाणांनी त्यांचा गौरव केला. तुम्ही कुठले कालचे आलेले स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणतात.’’ असंही फडणवीसांनी यावेळी सांगितलं.

पहिली गुप्त कार्य करणारी संस्था तयार करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते –

याशिवाय, ‘’सावरकर एक असं नाव आहे, की ज्यांनी अगदी कोवळ्या वयात भारतीय स्वातंत्र्यासाठी चळवळ सुरू केली. या देशात पहिली सिक्रेट सोसायटी स्थापन करणारे, पहिली गुप्त कार्य करणारी संस्था तयार करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते. छोट्या-छोट्या तरुणांना एकत्रित केलं आणि त्यांना सोबत घेऊन सावरकरांनी संस्था तयार केली. त्यामाध्यमातून स्वातंत्र्य लक्ष्मीची ज्योत पेटवण्याचं काम हे सावरकरांनी सुरू केलं. तिथपासून सावरकरांनी जे एक व्रत घेतलं, ते शेवटपर्यंत त्यांनी पाळलं. आपल्याला माहिती आहे हजारो, लाखो क्रांतीकारकांना स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रेरणा होती. सावरकरांनी ज्यावेळी लंडन हाऊसमध्ये स्वातंत्र्याची ज्योत तयार करणं सूरू केलं. इंग्रजांना सळो की पळो कसं करता येईल, ते काम सावरकरांनी केलं. इंग्रजी अधिकाऱ्याचा वध करणाऱ्या मदनलाल धिंग्रा या तरूण क्रांतीकारकाच्या पाठीशी सावरकरांची प्रेरणा होती.’’ अशी माहिती फडणवीसांनी दिली.

अन् सावरकरांच ते पुस्तक देशाच्या क्रांतीकारकांसाठी गीतेसमान झालं –

तसेच, ‘’एकीकडे लोकमान्य टिळकांसारखे आमचे नेते ज्यांनी सांगितलं की इंग्लंडच्या राणीच्या भरोवशावर स्वातंत्र्य मिळणार नाही. ते आम्हाला भिकेमध्ये नको स्वातंत्र्या हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि आम्ही तो मिळवणारच, हे सांगणारे लोकामान्य टिळक होते. तर दुसरीकडे स्वातंत्र्य मिळवायचं असेल, तर ते सशस्त्र क्रांतीनेच मिळू शकतं, हे सांगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते. पहिल्यांदा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १८५७ ची लढाई हे शिपायांचं बंड नाही, १८५७ ची लढाई भारतीय स्वातंत्र्याचं पहिलं स्वातंत्र्यसमर आहे असं सांगितलं. म्हणून त्यावर सावरकरांनी तो इतिहास लिहिणारं पूर्ण पुस्तक लिहिलं आणि हळूहळू हे पुस्तक स्वातंत्र्यवीरांसाठी आणि देशाच्या क्रांतीकारकांसाठी गीतेसमान झालं. या पुस्तकाने एकप्रकारे क्रांती केली. लोकांच्या आणि तरुणांच्या मनात क्रांतीची ज्वाला पेटवली. इंग्रजांनी हे पुस्तक प्रकाशित होऊ दिलं नाही. तर आमच्या क्रांतीकारकांनी हाताने लिहून हे पुस्तक प्रकाशित केलं आणि घरोघरी, तरुणांकडे याच्या प्रति पोहचल्या. भगतसिंग यांनीही या  पुस्तकाची दुसरी आवृत्ती छापली, एवढंच नाही तर आझाद हिंद सेनेत जे तरूण भरती व्हायचे, त्यांना नेताजी सुभाषचंद्र बोस हे पुस्तक वाचण्यास सांगायचे.’’ असंही यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Deputy Chief Minister Devendra Fadnavis criticizes Congress for insulting freedom hero Savarkar during Savarkar Gaurav Yatra

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात