कर्नाळा बँकेतील ठेवीदारांना मिळाले पैसे : आमदार महेश बालदी यांनी मानले पंतप्रधान मोदी यांचे आभार

विशेष प्रतिनिधी

नवी मुंबई : कर्नाळा बँकेतील ठेवीदारांचे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्यामुळे मिळाले आहेत. त्याबद्दल म्हणून सर्व प्रथममी त्यांचे आभार मानतो, असे कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीचे अध्यक्ष आणि उरणचे आमदार महेश बालदी यांनी सांगितले. Depositors in Karnala Bank get money: MLA Mahesh Baladi thanked Prime Minister Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिपॉजीटर इंन्शुरन्स स्कीम विधेयक लोकसभेत मंजूर केले. पूर्वी १ लाखाचे डिपॅजीटर इंन्शुरन्स स्कीम होती. ती ५ लाख झाली. त्यामुळे ठेवीदारांना आता इंन्शुरन्सचे पैसे मिळणार आहेत. काही लोक अभिमानाने गर्वाने सांगत आहेत. हे पैसे आम्ही आणले. विशेषतः शेकापचे आमदार बाळाराम पाटलांनी आणले, असे सांगितले जात आहे. मोदी कायदा बदलला. त्याचा फायदा ठेवीदारांना झाला. बाळाराम पाटील भारतीय जनता पक्षाचा प्रचार करायला निघालेत म्हणून त्यांना तसे वाटत असावे.



या मध्ये राज्य सरकारचा दमडा आहे का नाही. त्यांनी काय केले आहे ? ठेवीदारांचे पैसे मोदींनी दिलेल्या योजनेमुळे मिळतायत त्याचा आनंद घ्या. मोदींनी गोरगरिब जनतेला त्यांचे कष्टाचे पैसे परत मिळवून दिले. ज्या विवेकानंद पाटील यांनी कर्नाळा बँकेत घपला केला आज ते ८ महिन्यांपासून जेलमध्ये आहेत. तरी ना लज्जा ना भय आणि मोठ्या उजळ माथ्याने सांगतायत हे पैसे आम्ही आणतोय. हे लज्जास्पद घृणास्पद आणि चोराच्या उलट्या बोंबा असा प्रकार आहे, असे आमदार महेश बालदी म्हणाले.

Depositors in Karnala Bank get money: MLA Mahesh Baladi thanked Prime Minister Modi

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात