या निवडणुकीत ६४.९५ % इतकं मतदान झालंय. दुपारी १३ ते १ च्या दरम्यान देगलूरचा पुढचा आमदार कोण, हे स्पष्ट होईल. DEGLUR BY POLL RESULT: Will Deglur be Pandharpur? Who is MLA – Sabane or Antapurkar? State’s attention …
विशेष प्रतिनिधी
नांदेड : नांदेडमधील देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शनिवारी ६४ टक्के मतदान झाले होते. देगलूर येथे आज, मंगळवारी (२ नोव्हेंबर) या निवडणुकीची मतमोजणी होत आहे. तत्कालीन आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक घोषित करण्यात आली होती.
आज सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. १४ टेबलवर ३० फेऱ्यांची ही मतमोजणी होईल. या निवडणुकीत ६४.९५ % इतकं मतदान झालंय. दुपारी १३ ते १ च्या दरम्यान देगलूरचा पुढचा आमदार कोण, हे स्पष्ट होईल.
काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर देगलूरमध्ये पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत एकूण १२ उमेदवार रिंगणात आहेत. असं असलं तरी ३ पक्षात प्रामुख्याने ही लढत होत आहे.
या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कारण संपूर्ण महिनाभर मंत्री अशोक चव्हाण देगलूर बिलोलीमध्ये होते. तर भाजपचे अनेक नेते आमदार पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण देगलूरमध्ये जीवाचं रान करुन प्रचार केला.
ही पोटनिवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची ठरत आहे. निवडणुकीच्या आधी शिवसेनेत असलेले सुभाष साबणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना प्रवेश केल्यानंतर उमेदवारीही मिळाली तर दुसरीकडे काँग्रेसनं दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना संधी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App