वानखेडें कुटुंबीयांची बदनामी केल्याप्रकरणी नवाब मलिकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश 

वृत्तसंस्था

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात राष्ट्रवादीचे प्रवक्ते – मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात सव्वा कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. तेव्हा न्यायालयाने मलिक यांना १० नोव्हेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला.Defamation suit filed by Dnyandev Wankhede father of Mumbai NCB Zonal Director Sameer Wankhede

समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांचे आरोप-प्रत्यारोप गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे हे हिंदू नाहीत, मुस्लिम असल्याचे सांगत थेट त्यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्यावर आरोप केले. त्यावर ज्ञानदेव वानखेडे यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र प्रसिद्ध केले. आता वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला. वानखेडे यांच्या वतीने वकील अर्शद शेख यांनी युक्तीवाद केला, तर मलिक यांच्या वतीने वकील अतुल दामले यांनी युक्तीवाद केला. मलिक यांच्या विरोधात भाजपचे नेते मोहित भारती यांनीही १०० कोटी रुपयांचा बदनामीचा दावा दाखल केला आहे.

काय म्हटले आहे वानखेडेंनी त्यांच्या दाव्यात?

  •  नवाब मलिक यांच्या आरोपामुळे कुटुंबाचे आणि वैयक्तीक भरून न येणारे नुकसान झाले आहे.
  •  नवाब मलिक यांना सोशल मीडिया, प्रसारमाध्यमे यांवर आमची बदनामी होईल असे वक्तव्य करण्यास कायमस्वरूपी बंदी आणावी
  •  आमची बदनामी केलेली आतापर्यंतची वक्तव्ये, प्रसिद्धी पत्रके आणि ट्विट डिलीट करण्याचे आदेश द्यावेत
  •  पत्रकार परिषद आणि सोशल मीडियामधून वक्तव्य करून त्यांनी आमच्या कुटुंबाची मानहानी केली, त्यामुळे नवाब मलिक यांनी सव्वा कोटी रुपयांची भरपाई करावी.

Defamation suit filed by Dnyandev Wankhede father of Mumbai NCB Zonal Director Sameer Wankhede

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात